जळगाव येथील घटना
जळगाव – येथील यावल गावात भाजपची विजयी मिरवणूक संध्याकाळी ५ वाजता काढण्यात आली. मिरवणूक नगिना मशिदीजवळ आल्यावर तेथे मुसलमानांनी डीजेला (मोठ्या ध्वनीक्षेपक यंत्रणेला) विरोध केला, तसेच ‘मशिदीजवळ डीजे वाजवू नका’, असे म्हणत मिरवणुकीवर दगडफेक केली. एका हिंदूला दगड लागला. काही वेळ तणावपूर्ण वातावरण होते. त्यानंतर मिरवणूक पुन्हा मार्गस्थ झाली.
(म्हणे) ‘दगडफेक झालीच नाही !’ – पोलीस उपनिरीक्षकदगडफेक होऊनही स्थानिक पोलीस उपनिरीक्षक गोरे म्हणाले, ‘‘दगडफेक झालीच नाही.’’ (दगडफेक करणार्यांवर कारवाई करणे दूरच; पण असे दायित्वशून्य विधान करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशा पोलिसांवर महायुती सरकारने कारवाई करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित ! – संपादक) |
संपादकीय भूमिकासत्तेत आलेल्या पक्षाच्या मिरवणुकीत दगडफेक करण्याचे मुसलमानांचे धाडस होते, यावरूनच ते कायदा-सुव्यवस्थेला जुमानत नसल्याचे सिद्ध होते ! |