इस्लामचा अवमान करणार्‍यांना फाशी देण्याची बांगलादेशाच्या सर्वाेच्च न्यायालयाची सरकारला विनंती

बांगलादेश सर्वाेच्च न्यायालय

ढाका (बांगलादेश) – येथील सर्वाेच्च न्यायालयाने इस्लाम किंवा पैगंबर यांचा अवमान केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्याची शिफारस केली आहे. त्याच वेळी युनूस सरकारमध्ये सहभागी असलेल्या एका मौलानाने सौदी अरेबियाच्या मशिदीप्रमाणे देशात मशिदी विकसित करणार असल्याचे सांगितले आहे. याद्वारे बांगलादेशाचे इस्लामीकरण केले जात आहे, असेच दिसून येत आहे.

१. बांगलादेश उच्च न्यायालयाने सांगितले की, कुराण आणि महंमद पैगंबर यांच्या विरोधात अनावश्यक, निर्लज्ज, हट्टी अन् चिथावणीखोर भाषणे करणे अशा कृतींसाठी फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप यांसारख्या शिक्षेची तरतूद असावी कि नाही ? यावर संसदेने विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही धर्माच्या लोकांना दुखावणारे किंवा त्यांच्यात भीती, आणि दहशत निर्माण करणार्‍या अशा कोणत्याही प्रक्षोभक भाषणाला किंवा अशा कृतींना आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

२. महंमद युनूस सरकारमधील खालिद हुसैन यांनी सौदी अरेबियाच्या मदिना मशिदीच्या धर्तीवर चितगावमध्ये मशीद विकसित करण्याची घोषणा केली आहे. सरकार यासाठी १० कोटी रुपये खर्च करणार आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील सर्वाेच्च न्यायालयच अशी मागणी करते, तर भारतातील हिंदूंनी त्यांच्या धर्माचा अवमान करणार्‍यांना अशी शिक्षा करण्याची मागणी केली, तर चूक ते काय ?