जुन्नर (जिल्हा पुणे), २४ नोव्हेंबर (वार्ता.) – इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाणदिनी म्हणजेच २४ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ ते ११ या कालावधीमध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस अभिषेक घालून नंतर पूजा करण्यात आली. ही पूजा नांदेड येथील श्री. रामचंद्र मुकुंद मुळे आणि सौ. मुळे यांनी केले. त्यांच्या लग्नाचा ३० वा वाढदिवस होता. उत्तररात्री ३ वाजेपर्यंत आश्रमात सर्वत्र दीप लावण्यात आले होते. दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशात कांदळी येथील आश्रम उजळून निघाला होता. त्यानंतर ‘हरि ॐ तत्सत’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांनी या प्रसंगी प.पू. बाबांच्या आठवणी़ सांगितल्या.
डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांचा त्यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान !
डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त श्री. व सौ. कुर्डूकर यांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि साडी देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी श्री. प्रशांत कुलकर्णी (पुणे), श्री. कुलकर्णी (पनवेल) आणि श्री. कुबल यांनी डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.