कॅनडातील २५ टक्के पालक मुलांना पोसण्यासाठी स्वतःच्या जेवणात करत आहेत कपात !

पंतप्रधान ट्रुडो यांच्या कारभाराचा परिणाम !

ओटावा (कॅनडा) – पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली कॅनडा सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. कॅनडामध्ये रहाणारे २५ टक्के पालक त्यांच्या मुलांना पुरेसे अन्न पुरवण्यासाठी स्वतःच्या जेवणात कपात करत आहेत. एका संस्थेच्या अहवालात असे उघड झाले आहे की, ४ पैकी १ पालक त्यांच्या मुलांचे पोट भरण्यासाठी स्वतःची भूक मारत आहेत. ‘साल्वेशन आर्मी’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ९० टक्क्यांहून अधिक लोकांनी सांगितले आहे की, त्यांनी पैसे वाचवण्यासाठी किराणा सामानावरील खर्च न्यून केला आहे.

कॅनडातील लोकांची क्रयशक्ती अल्प झाली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी ट्रुडो सरकार काही अत्यावश्यक वस्तूंवर वस्तू आणि सेवा करातून (‘जीएस्टी’तून) सूट घोषित करण्याची अपेक्षा आहे.

संपादकीय भूमिका

असे असतांनाही कॅनडातील नागरिक पंतप्रधान ट्रुडो यांच्या धोरणांच्या विरोधात रस्त्यावर येत नाहीत, याचेच आश्चर्य आहे !