Ghatkopar Love Jihad : मुसलमान युवकावर कारवाई न झाल्यास आंदोलन करू !

घाटकोपरमधील ‘लव्ह जिहाद’प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची चेतावणी

किरीट सोमय्या

मुंबई – घाटकोपरमध्ये एक हिंदु तरुणी एका तरुणासमवेत पळून गेली होती. तिने तिच्या घरून काही पैसेही नेले होते. हा प्रकार ‘लव्ह जिहाद’चा असून संबंधित मुसलमान तरुणावर गुन्हा नोंदवण्यात यावा, अन्यथा उद्या पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करू, अशी चेतावणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. त्यांनी तरुणीच्या कुटुंबासह घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘व्होट जिहाद’, ‘लँड जिहाद’ बंद करा.

काय आहे प्रकरण ?

घाटकोपर येथील चिरागनगर येथे ४ दिवसांपूर्वी एका मुसलमान युवकाने येथील हिंदु युवतीला पळवून नेले. युवतीच्या पालकांनी चिरागनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली; मात्र प्रारंभी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणामुळे प्रक्षुब्ध हिंदुत्वनिष्ठांनी कारवाईची मागणी केल्यानंतर १९ नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला.

संपादकीय भूमिका 

अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?