हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या ठिकाणी लावण्याच्या प्रदर्शनासाठी फलकांची सूची उपलब्ध !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या कार्यकर्त्यांना सूचना

विविध कार्यक्रमांत विषय मांडतांना आपले बोलणे आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावी होऊन ते उपस्थितांच्या अंतर्मनात जाण्यासाठी स्वतःचे साधनाबळ वाढवा !

कार्यकर्त्यांनी व्यष्टी साधनेसाठी सातत्याने आणि तळमळीने प्रयत्न केले, तरच त्यांच्या वाणीत चैतन्य निर्माण होईल. त्या चैतन्यमय वाणीमुळे भाषणातील विषय धर्मप्रेमींच्या अंतर्मनापर्यंत तर पोचेलच; पण त्यासह ते धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांसाठीही उद्युक्त होतील, यात शंका नाही !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणार्‍या चित्रीकरणासाठी साहित्याची आवश्यकता !

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रीकरण केल्यास ते पुढच्या काळासाठी अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे आश्रमामध्ये साहित्याची आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे, ही चिरंतन आणि सर्वोत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वोत्तम आहेत. त्यामुळे साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.

१.१.२०२० ते ३१.३.२०२० या कालावधीत समष्टीसाठी नामजप करणार्‍यांनी आणि समष्टी स्तरावरील त्रास दूर होण्यासाठी साधकांनी करावयाचे नामजपादी उपाय

‘नामपट्टी शरिराला स्पर्श करून लावतांना नामपट्टीचा अक्षरे असलेला भाग बाहेरच्या दिशेने (निर्गुण) ठेवायचा कि आतल्या दिशेने (सगुण) ठेवायचा ?’, हे येथे दिले आहे….

राष्ट्र आणि धर्म जागृतीपर कार्यक्रमांच्या आरंभी, तसेच समारोपप्रसंगीही क्षात्रगीते लावावीत !

सध्या अनेक जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, हिंदू अधिवेशने, हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा आदी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांच्या आरंभी आणि समारोपप्रसंगीही क्षात्रगीते लावावीत. त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह वाढेल, तसेच हिंदु संघटनासाठी आवश्यक असलेले क्षात्रतेजही निर्माण होईल !

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडल्यावर त्यानंतरची १०० टक्के फलनिष्पत्ती मिळण्याच्या दृष्टीने अभिप्राय-पत्रकाचे महत्त्व लक्षात घ्या आणि उपस्थित धर्मप्रेमींकडून ते परिपूर्ण भरून घ्या !

सभेला उपस्थित राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी सर्वत्रच्या कार्यकर्त्यांनी अभिप्राय-पत्रकांचे महत्त्व जाणून त्यांचा पुढील प्रकारे प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.

सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक राहतात. त्यांपैकी काही जणांना हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी आहेत. असे रुग्ण आणि वृद्ध यांसाठी आश्रमात पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.

विविध उपक्रमांच्या वेळी जिज्ञासूंकडून योग्य प्रकारे अभिप्राय मिळावेत, यासाठी वक्त्यांनी व्यासपिठावरूनच अभिप्राय-पत्रक दाखवून ‘त्यात काय लिहिणे अपेक्षित आहे ?’, हे सांगावे !

अभिप्राय-पत्रके योग्य प्रकारे भरली जावीत, यासाठी वक्त्याने व्यासपिठावरूनच अभिप्राय-पत्रक दाखवून ‘त्या पत्रकात काय लिहिणे अपेक्षित आहे ?’, हे सांगावे. एका सभेत हा प्रयोग केल्यावर जवळजवळ ८० टक्के अभिप्राय-पत्रके योग्य प्रकारे भरली गेल्याचे लक्षात आले.

सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी ! ‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक राहतात. त्यांपैकी काही जणांना हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी आहेत. असे रुग्ण आणि वृद्ध यांसाठी आश्रमात पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.