तीन वर्षे हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यानंतर सातारा नगरपालिका पुन्हा या वर्षी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सेवा पुरस्कार’ वितरणासाठी प्रयत्नशील

ज्यांच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि ज्यांच्या संस्थेचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप होतात, त्यांच्या नावाने नगरपालिकेला पुरस्कार का द्यावासा वाटतो ?

सातारा नगरपालिका, डॉ. नरेंद्र दाभोलकर

सातारा, ११ जानेवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या वतीने ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सेवा पुरस्कार’ दिला जातो. या वर्षीही पालिकेच्या वतीने हा पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत; मात्र स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा या पुरस्काराला विरोध आहे. गत २-३ वर्षे या पुरस्कार वितरणाच्या विरोधात स्थानिक हिंदुत्वनिष्ठांकडून सर्व नगरसेवकांना निवेदन दिले गेले होते. याचाच परिणाम म्हणजे एक वर्ष हा पुरस्कार दिला गेला नाही. दुसर्‍या वर्षी वाढत्या विरोधामुळे विलंबाने दिला गेला आणि तिसर्‍या वर्षी कोरोनामुळे दिला गेला नाही. त्यामुळे या वर्षी पुरस्कार वितरणाविषयी स्थानिक हिंदुत्वनिष्ठांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.