गोळी झाडणार्‍यांचा चेहरा २०० मीटरवरून ओळखणे अशक्य ! – अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड, मुंबई उच्च न्यायालय

त्यक्षात २०० मीटरवरून कुणाचाही चेहरा ओळखणे अशक्य असते, तर ५०० मीटर अंतरावरून चेहरा दिसणे कसे शक्य आहे ? त्यामुळे हा साक्षीदार खोटी माहिती देत आहे, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी केला.

कोणत्याच संशयितांच्या विरोधात ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने सर्वांची निर्दोष मुक्तता करावी ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, मुंबई उच्च न्यायालय

इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, ‘सीबीआय’ने त्यांच्याच पोलीस अधिकार्‍यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. यातून हेच सिद्ध होते की, जे संशयित आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठीच आणि सनातन संस्थेला त्यात गोवण्याच्या दृष्टीनेच हे अन्वेषण करण्यात आले.

अखिल मानवजातीचे हित साधणे, हाच सनातन संस्थेचा उद्देश !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी संवाद साधून संस्थेचे मत जाणून घेतले आहे. या संवादातून विरोधकांचे षड्यंत्र आणि सनातन संस्थेचा मानवहितकारी उद्देश लक्षात येईल.

विनय केळकर आणि किरण कांबळे हे दोन खोटे साक्षीदार ‘सीबीआय’ने उभे केले ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षीदार विनय केळकर आणि किरण कांबळे यांनी मुख्य संशयित शरद कळसकर अन् सचिन अंदुरे यांनी ओळखले आहे, असा दावा ‘सीबीआय’ने केला आहे.

संशयित शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची छायाचित्रे ओळखल्याचा सीबीआयकडून केवळ ‘फार्स’! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

सरकारी पक्ष आणि साक्षीदार यांनी केवळ ‘सनातन संस्थे’लाच लक्ष्य करण्याच्या उद्देशाने कशा प्रकारे साक्षी दिलेल्या आहेत, तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील विविध दाखले देत विविधांगी युक्तीवाद केला.

‘यूएपीए’च्या प्रक्रियेतील अनेक गोष्टींचे पालन केलेले नसल्याने तो कायदा संशयितांना लावणे पूर्णत: चुकीचे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

संशयितांवर ‘यूएपीए’ कायदा लावण्यात आला आहे; मात्र तो लावतांना ज्या अनेक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, ते करण्यात आलेले नाही. हे कलम लावतांना संपूर्ण दोषारोपपत्रात कुठेही हा गुन्हा शासनाच्या विरोधात होता, तसेच यातून देशविरोधी कारवाया होतील, असे काहीच सिद्ध होत नाही.

डॉ. दाभोलकरांची हत्या होण्यापूर्वी ते आदल्या रात्री आणि सकाळी कुठे होते ? हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकलेला नाही ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे या वेळी उपस्थित होते.

सीबीआय’कडील पिस्तुलाने खून झाला का ?

साम्यवाद्यांच्या हिंदूंविरोधातील अनेक स्तरांवरील लढा आणि त्यांनी केलेल्या सहस्रो हत्या पहाता ४ साम्यवाद्यांच्या हत्यांचे खापर हिंदूंवर फोडण्याचा त्यांचा आटापिटा या मोठ्या अन्वेषणातील या एका प्रकरणातूनही लक्षात येईल.

दाभोलकर-पानसरे हत्येच्या भरकटलेल्या तपासाच्या कथा

‘वर्ष २०१३ मध्ये अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, वर्ष २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे आणि साहित्यिक प्रा. एस्.एम्. कलबुर्गी अन् वर्ष २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश या पुरोगाम्यांच्या हत्यांमागे हिंदुत्वनिष्ठ …

दाभोलकर-पानसरे हे खटले केवळ राजकीय कारणांनी प्रेरित ! – डॉ. अमित थढानी, लेखक

जोपर्यंत एखाद्या फोडातील ‘पू’ बाहेर काढल्‍याविना रोगी बरा व्‍हायला आरंभ होत नाही, तसेच आतील घाण बाहेर काढल्‍याविना ही स्‍थिती सुधारणार नाही, याची जाणीव झाल्‍याने मी ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ हे पुस्‍तक लिहिले.