सरपंचपदासाठी पैशांची बोली लागणे ही लोकशाहीची थट्टा !
मुंबई – ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी लिलाव होत असल्याचे काही व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाले होते. यामध्ये ग्रामपंचायतीची विनाविरोध निवड करून सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामस्थ बोली लावत असल्याचे स्पष्ट झाले होते. सरपंचपदासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागत असल्याचे प्रकार पुढे आले होते. याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर नोंद घेतली असून याविषयी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत निवडणूक आणि सरपंचपदाची निवड यांविषयी जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे.