उत्तरप्रदेशमध्ये नियमांचे उल्लंघन करून बढती मिळवणार्‍या ४ अधिकार्‍यांची थेट चौकीदार, कारकून आदी पदांवर नियुक्ती !

अशांची पदावनती न करता त्यांना थेट बडफर्तच केले पाहिजे; कारण अशा मानसिकतेच्या व्यक्ती खालच्या पदावर नियुक्त झाल्या, तरी पुन्हा भ्रष्टाचार करणार नाहीत, याची शाश्‍वती देता येणार नाही !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने भ्रष्टाचार आणि नियमांचे उल्लंघन करून बढती मिळवणारे यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून अप्पर जिल्हा सूचना अधिकारी पदावर नियुक्त असणार्‍या ४ अधिकार्‍यांना मिळालेली बढती रहित करून त्यांची पदावनती करत त्यांना थेट चौकीदार, कारकून, ऑप्रेटर आणि साहाय्यक या पदांवर नियुक्त केले आहे.

खालील चित्रावर क्लिक करा –

(सौजन्य : ZeeNews)

यापूर्वीही चुकीच्या मार्गाने बढती मिळवल्याचे उघड झाल्यानंतर एका उपविभागीय दंडाधिकार्‍यावर कारवाई करत त्याला तहसीलदार पदावर नियुक्त करण्यात आले होते.