शेतकर्‍यांच्या आंदोलामुळे देशाची प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी ! – सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेतून दावा

काँग्रेसने तिच्या जवळपास ५५ वर्षांच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी कारभार केला असता, तर आज शेतकर्‍यांची स्थिती वाईट झाली नसती !

मध्यप्रदेशमध्ये दगडफेक करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा होणार

प्रस्तावित कायद्यामध्ये दगडफेक करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. संपूर्ण वसुली संबंधित आरोपींकडून केली जाणार आहे. धार्मिक स्थळांवरून दगडफेक झाली, तर हे धार्मिक स्थळ सरकारकडून अधिग्रहित करण्यात येणार आहे.

औरंगजेब धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे.

न्यायसंस्थेवर अतिक्रमण करणारी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी आणि तिला प्रखर विरोध करणारे कणखर न्यायमूर्ती !

आणीबाणीला आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीला विरोध करणाऱ्या न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, शेलाट, ग्रोवर, हेगडे आणि खन्ना यांचे नाव आजही आदराने घेतले जाते !

गुन्ह्याची माहिती लपवल्याने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे पारपत्र कह्यात

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, तसेच काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी स्वतः केलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याने त्यांचे पारपत्र नागपूर पारपत्र विभागाने कह्यात घेतले आहे.

कोडगुवासियांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा नोंद

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या काँग्रेसी नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

वक्फ बोर्डा’च्या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू !

‘सद्य:स्थितीत भारतीय रेल्वेच्या नंतर सर्वाधिक भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या नावे आहे. वर्ष १९२३ मध्ये ‘वक्फ बोर्डा’ला सामान्य अधिकार होते; मात्र काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अनुक्रमे वर्ष १९५४, १९९५ आणि २०१३ मध्ये ‘वक्फ बोर्डा’ला अधिकाधिक विशेषाधिकार देण्यात आले.

(म्हणे) ‘शहराचे नाव पालटून तेथील वातावरण बिघडवू नका !’ – बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्यावर कुणाच्या भावना दुखावल्या जाण्याला आणि वातावरण बिघडायला ते औरंगजेबाचे वंशज आहेत का ?

शेळ-मेळावली येथे तणावपूर्ण शांतता : २१ जणांवर गंभीर गुन्हे प्रविष्ट

मेळावली येथे ६ जानेवारी या दिवशी झालेल्या हिंसक आंदोलनावरून पोलिसांनी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे नेते आदी मिळून एकूण २१ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट केले आहेत, तर गुन्हे अन्वेषण विभागाने परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक केली आहे.

नेपाळचा भारतात विलिनिकरण करण्याचा प्रस्ताव नेहरू यांनी फेटाळाला होता ! – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा पुस्तकातून दावा

अशी मोठ्या प्रमाणात हानी करणारे नेहरू देशाचे गुन्हेगारच आहेत ! त्यांचे असे राष्ट्रघातकी निर्णय देशाच्या संसदेत लावून, शाळा शाळातून शिकवले गेले पाहिजेत.