|
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकारकडून दगडफेक करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा बनवण्यात येणार आहे. यासाठी मसुदा बनवण्याचे काम चालू आहे. हा मसुदा लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. या कायद्यांतर्गत एक लवाद स्थापन करण्यात येण्याची शक्यता आहे. या लवादासमोर दगडफेकीच्या घटनांची सुनावणी केली जाईल.
‘Strict law to be enacted against stone-pelting, vandalism’: CM Chouhanhttps://t.co/5ZQKghmX1V
— Hindustan Times (@HindustanTimes) January 3, 2021
१. प्रस्तावित कायद्यामध्ये दगडफेक करणार्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. दगडफेकीत सरकारी किंवा जीवितहानी होत असेल, तर याची संपूर्ण वसुली संबंधित आरोपींकडून केली जाणार आहे. यासाठी आरोपीची संपत्ती विकण्यात येणार आहे. धार्मिक स्थळांवरून दगडफेक झाली, तर हे धार्मिक स्थळ सरकारकडून अधिग्रहित करण्यात येणार आहे.
२. राज्यातील भाजप सरकारने प्रस्तावित कायदा करण्याचे घोषित केल्यानंतर काँग्रेसने यास विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, जनतेच्या संदर्भातील सूत्रांकडे दुर्लक्ष करण्यासाठी भाजप वेगवेगळे प्रकार करत आहे.
३. काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देतांना भाजपचे आमदार आणि हंगामी सभापती म्हणाले की, जर काँग्रेस दगडफेक करणार्यांचे समर्थन करत असेल, तर तिने तसे उघडपणे सांगायला हवे आणि दगडफेकीच्या घटनांचे दायित्व घेतले पाहिजे.