कोडगुवासियांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा नोंद

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या काँग्रेसी नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

कोडगु (कर्नाटक) – ‘कोडगुवासीही (कोडव समुदायही) गोमांस भक्षण करतात’ असे विधान केल्याच्या प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी मडिकेेेेरी पोलीस ठाण्यात सीआरपीसी कलम १५३अ (धार्मिक तेढ निर्माण करणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पश्‍चिम घाट संरक्षण समिती अध्यक्ष रवी कुशालप्पा यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.

कोडगुवासी गायीला पूजनीय मानतात, तसेच कोडगु प्रदेशात गोहत्या आणि गोमांसभक्षण निषिद्ध आहे. ब्रिटिशांच्या काळापासूनच हा नियम येथे लागू आहे. असे असतांना सिद्धरामय्या यांनी वरील विधान केल्याने येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‘सिद्धरामय्या यांनी त्यांचे विधान मागे घेऊन जाहीर क्षमायाचना करावी’, अशी मागणी त्यांनी आली आहे.

या आरोपावर सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण देतांना, ‘कोडगुवासी गोमांस खातात’ हे विधान प्रसारमाध्यमांनी माझ्या तोंडी चुकीच्या पद्धतीने घातले आहे. यामुळे कोडव समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी क्षमायाचना करतो. माझ्या शेजारचा जिल्हा असलेल्या कोडगुच्या संस्कृतीविषयी मला जाणीव आहे आणि अभिमानही आहे’, असे ट्वीट केले आहे. यावर समाधान न झालेल्या कोडगुवासियांनी जाहीर क्षमायाचना करण्याचा आग्रह धरला आहे.