भारत शास्त्रज्ञांमुळेच चंद्रावर पोचला; मात्र पाकिस्तानचे शास्त्रज्ञ सुईही बनवू शकत नाहीत ! – पाकिस्तानी मौलवी

अवकाश क्षेत्रातील अपयशासाठी त्यांनी पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना उत्तरदायी धरले आहे.

भारताने अफगाणिनस्तानमध्ये पाठवले ५० सहस्र मेट्रिक टन धान्य आणि २०० टन औषधे !

भारत एक हिंदूबहुल देश आहे आणि तो मुसलमानबहुल अफगाणिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र या देशात किती हिंदू शिल्लक आहेत ?

श्रीराममंदिराच्या खोदकामात सापडले आहेत देवतांच्या मूर्ती आणि स्तंभ !

यामध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आणि स्तंभ दिसत आहेत. याविषयीची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. श्रीराममंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या वेळी सापडलेले अवशेष  दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.

‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करत आहेत !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक !

श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर १ सहस्र संत ५ लाख हिंदूबहुल गावांत जाऊन कार्यक्रम करणार !

आयोजकांनी म्हटले की, देशातील ५५० जिल्हे आणि ५ लाख गावांमध्ये हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे. आम्ही केवळ त्यांच्यापर्यंत पोचू इच्छितो.

गोव्यातून भाग्यनगरला अमली पदार्थाची वाहतूक करणारे जाळे उद्ध्वस्त : तेलंगाणा पोलिसांची कारवाई

लिंगमपल्ली अनुराधा हिने ‘ती गोव्यातून अमली पदार्थ आणत होती’, याची स्वीकृती पोलिसांना दिली आहे. संशयित लिंगमपल्ली अनुराधा आणि तिचे दोन मित्र भाग्यनगर येथे जेवणाचा डबा पुरवण्याचे केंद्र चालवत होते.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) शहरात भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात लहान मुलगा गंभीररित्या घायाळ

कुत्र्यांची समस्याही सोडवू न शकणारे प्रशासन राज्याचा कारभार कसा हाकत असेल ?, हेच यावरून लक्षात येते ! यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात महिला कर्मचार्‍याशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी कर्मचारी निलंबित

गेल्या ७५ वर्षांत शालेय अभ्यासक्रमातून साधनेद्वारे नैतिकता न रुजवल्याचा परिणाम ! गोव्यासारख्या छोट्या राज्यात शिक्षक, पोलीस आणि आता रुग्णालयातील कर्मचारी यांनी महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले असून हे प्रकार वाढल्यास नवल नाही !

प्राचीन तंत्रज्ञानाचा वापर करून गोव्यात जहाजबांधणी होणार !

‘‘भारताला पुष्कळ समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा लाभलेली आहे आणि यामुळे प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे.’’

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे असेच प्रकरण ताजे असतांनाच आता हा ही एक प्रकार ! गोवा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक !