हिंदुद्वेषी तिस्ता सेटलवाड यांच्या संस्थेकडून मंदिर परिषदेच्या विरोधात अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
मुंबई – ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ (सीजेपी) या संस्थेने शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या ‘तिसर्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या पूर्वी हस्तक्षेप करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली आहे.
सीजेपीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, या परिषदेतील भाषणांमुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे; कारण या परिषदेचे आयोजन हिंदु जनजागृती समितीने केले असून ती फूट पाडणार्या विधानांसाठी ओळखली जाते. कार्यक्रमाचे अस्पष्ट धोरण आणि शिर्डीचा धार्मिक सलोख्याचा इतिहास पहाता शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि धार्मिक ऐक्याला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदुद्वेषी तिस्ता सेटलवाड यांच्या हिंदुविरोधी कारवाया पहाता त्यांना हिंदु परिषदेसारख्या कार्यक्रमांमुळे पोटशूळ उठल्यास नवल ते काय ? |