मराठा समाजाच्या वतीने ११ सप्टेंबरला ‘ठाणे बंद’ची हाक !

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी ठाणे बंद पुकारला आहे.

मराठवाड्यात मंत्रीमंडळ बैठकीसाठी ५०० खोल्या आणि २०० वाहनांची व्यवस्था !

‘राज्यावर कर्जाचा डोंगर असतांनाही लक्षावधी रुपये व्यय करून मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक घेणे आवश्यक आहे का ?’, असा प्रश्न जनतेच्या मनात आल्यास चूक ते काय ?

शिवरायांची वाघनखे १६ नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत ! – मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ वस्तूसंग्रहालयात आहेत. ती महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू देणार नाही ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर

पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, यासाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल.

‘जी-२०’ परिषदेच्या आयोजनावरून चीनकडून भारताची स्तुती : अमेरिकेवर टीका !

‘जी-२०’ शिखर परिषदेच्या आयोजनावरून चीनने भारताची स्तुती केली आहे.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढणार्‍या मंडळांवरील गुन्हे मागे घ्या ! – भाजपचे निवेदन

पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमन मिरवणुकीच्या वेळी कार्यकर्ते आणि पारंपरिक वाद्ये वाजवणारे कार्यकर्ते यांच्यावर नोंद झालेले गुन्हे हे निषेधार्ह आहेत. असे झाल्यास भविष्यात तरुण पिढी पारंपरिक वाद्यांकडे वळणार नाही.

यवत (जि. पुणे) येथे ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी’ असल्याचे सांगून महिलेवर ९ वर्षे अत्याचार !

धमकी देत ३५ लाख रुपये घेतले

‘जी-२०’ झाली कोट्यवधी भारतियांची परिषद ! – पंतप्रधान मोदी

भारतात ‘जी-२०’ जनतेची परिषद झाली असून कोट्यवधी भारतीय या परिषदेशी जोडले गेले, असे पंतप्रधान मोदी यांनी परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा नोंद !

कथित शव पिशव्या (बॉडी बॅग) प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा नोंद केला आहे.