गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. पोलिसांनी कारवाई करून धर्मांतर करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्यावतीने त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी चर्चा केली. त्यांना समितीचा ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ, तसेच हलाल प्रमाणपत्र रहित करण्याच्या प्रक्रियेसंबंधीचे निवेदन देण्यात आले.

‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’ आणि महापालिका यांच्या वतीने शहरात ५ सहस्रांहून अधिक छायाचित्रक बसवले !

नागरिकांमध्ये नियम पालन करण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी कठोर शिक्षेसह त्यांची नीतीमत्ता उंचावण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणेही आवश्यक !

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा ३० सप्टेंबरपासून दौरा चालू होणार !

आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम कसे चालू आहे ? त्याविषयी सरकारकडून अधिकृत काहीच माहिती आलेली नाही. त्यांनी माहिती दिली नाही, तरी हरकत नाही.

(म्‍हणे), ‘पुणे येथे सहस्रो महिला अथर्वशीर्ष म्‍हणायला रस्‍त्‍यावर दिसल्‍या; पण फुलेवाड्यात कुणी गेले नाही !’ – छगन भुजबळ, मंत्री Ganeshotsav

गणेशोत्‍सवात अथर्वशीर्ष म्‍हणणे, हे सयुक्‍तिक आहे; परंतु या काळात फुलेवाड्यात जाण्‍याचा काय संबंध ? पुणेकरांच्‍या मनात फुलेवाड्याविषयी कोणताही द्वेष नाही; मात्र अशी वक्‍तव्‍ये मंत्र्यांकडून जातीद्वेषापोटीच केली जात आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

पुण्यातील ५ मानाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन ! ९ घंट्यांहून अधिक काळ चालली मिरवणूक !

पुण्यातील पाचवा केसरीवाडा येथील गणपतीच्या मिरवणुकीला ८ घंटे लागले. पाचवा केसरीवाडा गणेशमूर्तीचे सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

पुणे येथे ‘क्‍लिनिक’मध्‍ये मद्य पाजून आधुनिक वैद्याचा तरुणीवर बलात्‍कार !

सामाजिक माध्‍यमावर झालेल्‍या ओळखीतून तरुणीला आधुनिक वैद्याने ‘क्‍लिनिक’मध्‍ये बोलवून तिला मद्य पाजून बलात्‍कार केल्‍याची घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे कुत्र्यांच्‍या चाव्‍यामुळे १० वर्षांत ५९ जणांचा मृत्‍यू !

महानगरपालिकेच्‍या आकडेवारीनुसार ४ वर्षांपूर्वी मोकाट कुत्र्यांची संख्‍या अनुमाने ४० सहस्र होती. आतापर्यंत ही संख्‍या ५० सहस्रांपर्यंत गेली आहे. 

सातारा नगर परिषदेकडून ‘उपयोगकर्ता शुल्का’ची आकारणी !

हा कर तात्काळ मागे घेण्यात यावा. नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. याविषयी नगर विकास विभागाशी चर्चा करून योग्य तो निर्णय व्हावा, अशी सातारावासियांची अपेक्षा आहे.

मुंबईतील रेल्‍वेस्‍थानकांवर अत्‍याधुनिक सीसीटीव्‍ही कॅमेरे लावणार !

रेल्‍वे प्रवाशांच्‍या सुरक्षिततेसह, रेल्‍वे स्‍थानकांतील गुन्‍हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत सीसीटीव्‍ही कार्यान्‍वित करण्‍याचा निर्णय रेल्‍वे मंत्रालयाने घेतला आहे. ‘रेलटेल’च्‍या साहाय्‍यानेने प्रवासी सुरक्षिततेचे आधुनिकीकरण करण्‍यात येणार आहे.