गोवा वैद्यकीय महाविद्यालयात महिला कर्मचार्‍याशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी कर्मचारी निलंबित

पणजी, १२ सप्टेंबर (वार्ता.) – बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला कर्मचार्‍याशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी कर्मचारी सुमेश होबळे याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

महिलेशी गैरवर्तन केल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर संबंधित कर्मचार्‍याची खात्यांतर्गत चौकशी करणार आहेत आणि या चौकशीच्या अंती संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्याला सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • गेल्या ७५ वर्षांत शालेय अभ्यासक्रमातून साधनेद्वारे नैतिकता न रुजवल्याचा परिणाम आता दिसून येत आहे.
  • गोव्यासारख्या छोट्या राज्यात शिक्षक, पोलीस आणि आता रुग्णालयातील कर्मचारी यांनी महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले असून हे प्रकार वाढल्यास नवल नाही !