गोव्यातील कुख्यात गुंड सुलेमान याला केरळ येथे अटक !

पणजी, २४ डिसेंबर (वार्ता.) – गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोठडीतून पळालेला कुख्यात गुंड आणि भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलेमान सिद्धीकी याला केरळ येथे पोलिसांनी कह्यात घेतले. सुलेमान याला २३ डिसेंबर या दिवशी गोव्यात आणण्यात आले आहे आणि पुन्हा तो पोलिसांच्या हातून सुटू शकणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २३ डिसेंबर या दिवशी मडगाव येथे दिली.

कुख्यात गुंड सुलेमान याने १३ डिसेंबर या दिवशी भारतीय राखीव दलाचा माजी हवालदार अमित नाईक याच्या सहकार्याने गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते.