मराठा आरक्षणाचा शासन निर्णय न्‍यायालयात टिकणारा असावा !

मराठा आरक्षणासाठी आंदोलने करणार्‍या कार्यकर्त्‍यांविरुद्ध नोंद करण्‍यात आलेले गुन्‍हे तातडीने मागे घ्‍यावेत. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाविषयी केलेल्‍या मागण्‍या राज्‍य सरकारने तातडीने मान्‍य कराव्‍यात.

सरकारचे साक्षी-पुरावे संपल्‍याची सीबीआयची माहिती !

महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्‍या हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने साक्षी पुरावे संपल्‍याचा अर्ज सादर केला आहे. त्‍यामुळे संशयितांचे म्‍हणणे (जबाब) नोंदवले जाणार असून त्‍यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील.

छत्रपती संभाजीनगर येथे ७ वर्षांनी मंत्रीमंडळाची बैठक

शहरात १७ सप्‍टेंबर या दिवशी म्‍हणजे ७ वर्षांनी मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी रामा उपाहारगृहात मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री आणि सर्व मंत्री यांचे वास्‍तव्‍य असेल.

आमदार हरिभाऊ बागडे, अशोक चव्‍हाण अन् प्रशांत बंब यांना मराठा तरुणांनी विचारला जाब !

मराठा आरक्षणाच्‍या सूत्रावरून राज्‍यात मराठा समाजातील तरुण हे राजकीय नेत्‍यांना जाब विचारू लागले आहेत. केवळ सत्ताधारीच नाही, तर विरोधक आमदारही यातून सुटले नाहीत.

धनकवडीतील (पुणे) गणेशोत्‍सव मंडळांकडून १९ सप्‍टेंबरला एकत्रित मिरवणुकीचा निर्णय !

राष्‍ट्रीय एकतेची भावना वाढवण्‍यासाठी धनकवडीमधील ११ मंडळांच्‍या वतीने श्री गणेशचतुर्थीच्‍या दिवशी म्‍हणजे १९ सप्‍टेंबर या दिवशी एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्‍यात येणार आहे.

आजपासून तासगाव येथील श्री गणपति पंचायतन देवस्‍थानचा २४४ वा गणेशोत्‍सव !

भाद्रपद शुक्‍ल प्रतिपदा म्‍हणजे १६ सप्‍टेंबरपासून तासगाव येथील श्री गणपति पंचायतन देवस्‍थानचा २४४ वा गणेशोत्‍सव प्रारंभ होत आहे.

‘गूगल’ आस्‍थापन तक्रारदाराला देणार ७७३ कोटी रुपये !

इंटरनेटवरील सर्च इंजिन असणार्‍या ‘गूगल’विरुद्ध कॅलिफोर्निया येथील अ‍ॅटर्नी जनरल रॉब बोन्‍टा यांनी नुकताच एक खटला प्रविष्‍ट करण्‍यात आला होता. यात गूगलकडून वापरकर्त्‍यांची दिशाभूल केल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता.

मध्‍यप्रदेशातील डॉ. विष्‍णु जोबनपुत्र यांची सपत्नीक रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट !

मध्‍यप्रदेशमधील विदिशा जिल्‍ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्‍गुरु सेवा संघ ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त आणि सद़्‍गुरु संकल्‍प नेत्र चिकित्‍सालयाचे संचालक  डॉ. विष्‍णु जोबनपुत्र अन् त्‍यांच्‍या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट दिली.

जातीयवादात न अडकता हिंदु म्‍हणून एकत्रित येऊन धर्मरक्षण करणे काळाची आवश्‍यकता ! – टी. राजा सिंह, आमदार, तेलंगाणा

आपण स्‍वतःची ओळख करून देतांना गुज्‍जर, वाल्‍मीकि, राजपूत अशी देतो; पण नूंह (मेवात)मध्‍ये दंगल झाली, तेव्‍हा धर्मांधांनी ‘तुम्‍ही (हिंदू) कोणत्‍या जातीचे आहात ?’, हे पाहिले नाही.

यंदा प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार !

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट’सह पुण्यातील ५ मानाच्या गणपति मंडळांसह अखिल मंडई मंडळाचे विश्‍वस्त एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.