श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकरांचे नृत्य  !

अन्य धर्मीय कलाकार त्यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करतांना कधी दिसतात का ? हिंदु कलाकार मात्र पैशांसाठी असे करतात !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री गणेशमूर्तींचे दान न स्वीकारण्याचा देगाव ग्रामपंचायतीचा निर्णय !

समितीने प्रबोधन केल्यानंतर या फलकावरील मूर्तीदान घेण्याविषयीचा मजकुर दिसू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून त्यावर पट्टी लावण्यात आली.

श्री तुळजाभवानीदेवीचे मौल्यवान अलंकार हरवल्याच्या प्रकरणाचा अहवाल सादर होण्यापूर्वीच फुटला !

अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यापूर्वीच कसा फुटला ? एक अहवालही सांभाळू न शकणारे मंदिराचे प्रशासन देवीचे अलंकार कधीतरी सांभाळू शकेल का ?

बेगूसराय येथील शिवमंदिरातील शिवलिंग धर्मांध मुसलमानांनी तोडले !

बिहारमध्ये जंगलराज चालू झाल्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना घडत आहेत !

कोल्हापुरात गणेशभक्तांकडून बॅरिकेट्स (तात्पुरते अडथळे) तोडून पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

‘हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासनाला प्रदूषण कसे काय आठवते ? न्यायालयाचा मशिदीवरील भोंगे काढण्याचाही आदेश आहे, मग त्याचे पालन प्रशासन कधी करणार ? – श्री .उदय भोसले

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची चंडीगड येथील संपत्ती जप्त

पन्नू सध्या अमेरिकेत रहात आहे भारताने अमेरिकेकडे पन्नू याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली पाहिजे !

पाकिस्तानने अनधिकृतरित्या कह्यात घेतलेली भारताची भूमी रिकामी करावी !

पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.

जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली असून ते हवेत गोळीबार करत आहेत ! – मायकेल रुबिन, अमेरिकेचे माजी अधिकारी

मला वाटते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी अशा पद्धतीने भारतावर आरोप केले आहेत, ज्याचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत.

कॅनडामध्ये भारतियांमुळे अर्थव्यवस्थेला मिळतात ३ लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे !

खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात वाद निर्माण झाला आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचे सध्या थांबवले आहे. या निर्णयामुळे कॅनडातील अर्थतज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

निज्जर याच्या हत्येचे पुरावे काही आठवड्यांपूर्वी भारताला दिले !

काय पुरावे दिले, हे ट्रुडो जगजाहीर का करत नाहीत ?