गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

  • बायणा, वास्को येथे ‘स्कूल जिहाद’चे आणखी एक प्रकरण उघडकीस

  • प्राचार्यांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषद आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना

वास्को, १२ सप्टेंबर (वार्ता.) – दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालय या सरकारी अनुदानित शाळेच्या हिंदु विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे इस्लामी कार्यशाळेसाठी पाठवण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतांनाच बायणा, वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना इस्लामी कार्यशाळेच्या नावाखाली मशिदीत पाठवून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी १२ सप्टेंबरला बायणा, वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांना या प्रकरणी खडसावले. प्राचार्यांनी ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ या बंदी घातलेल्या संघटनेशी संलग्नित ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेच्या आवाहनाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवले. यासाठी शिक्षण खात्याची अनुमती घेतली नाही, तसेच संघटनेची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. या प्रकरणी विद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषद आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली आहे.

विश्व हिंदु परिषदेचे संजू कोरगावकर म्हणाले, ‘‘बायणा, वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी मशिदीत अशाच प्रकारे पाठवल्याची स्वीकृती प्राचार्यांनी दिली आहे. विद्यालयाच्या प्राचार्यांनी या प्रकरणी पूर्णपणे निष्काळजीपणा केला असून त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी.

(सौजन्य : In Goa 24×7) 

विश्व हिंदु परिषदेचे अन्य कार्यकर्ते म्हणाले, ‘‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला ‘तुर्कीस युथ फाऊंडेशन’ या आतंकवादी संघटनेकडून निधी मिळतो. विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादी बनवण्याचे हे एक षड्यंत्र आहे. ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’चे कार्यालय मिरामार येथे कार्यरत आहे. त्या ठिकाणी पूर्वी ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘सिमी’ या बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांची कार्यालये कार्यरत होती. पोलिसांनी यावर कारवाई करावी.’’ (‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ ही संघटना बंदी घातलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ म्हणजे सिमीचेच दुसरे रूप आहे. त्यामुळे पूर्वी ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘सिमी’ या बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांची कार्यालये ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ ही संघटना वापरते, यात नवल नाही ! त्यामुळे या संघटनेवर सरकारने बंदी घालायला हवी ! – संपादक)

(म्हणे) ‘आमचा उद्देश धार्मिक सलोखा टिकवून  ठेवण्याचा ! – ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’च्या पदाधिकार्‍यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले…

१. आमचा उद्देश धार्मिक सलोखा टिकवून ठेवणे आणि एकोपा निर्माण करणे हा होता. (असे असेल, तर या संघटनेचे कार्यकर्ते हिंदु धर्मानुसार एकदा तरी कृती करतील का ? एक दिवस तरी मूर्तीपूजा करतील का ? – संपादक)

२. विद्यार्थ्यांच्या अनुमतीविना आमची संघटना कोणतीच कृती करणार नाही. (प्राचार्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी नाही कसे म्हणतील ? विद्यार्थी अजाण अल्पवयीन असतात. त्यामुळे मशिदीत नेण्यापूर्वी त्यांच्या पालकांची अनुमती घेतली होती का ? काही विद्यार्थी मशिदीत यायला सिद्ध नसतांना प्राचार्यांनी त्यांना आत नेले. यातून काय दिसून येते ? – संपादक)

(सौजन्य : Goan Reporter News)

३. दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर यांचे निलंबन संबंधित शिक्षण संस्थेने मागे घ्यावे. (निलंबन नव्हे, तर त्यांना बडतर्फ करून हिंदूंची क्षमा मागायला भाग पाडले पाहिजे ! – संपादक)

४. गोमंतकियांनी नागरिकांची दिशाभूल करणार्‍या संघटनांच्या कृतींना बळी पडू नये. (‘चोराच्या उलट्या… ’ म्हणतात ते यालाच ! – संपादक)

५. आम्ही अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी इस्लामिक कार्यशाळेचे आयोजन करण्याची कृती मागील १० वर्षांपासून करत आहोत.’  (असे असेल, तर यातून हिंदूंचा निद्रिस्तपणा आणि तेथे जाणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांच्या पालकांनी याविषयी तक्रार न केल्याने ते केवळ जन्महिंदु असल्याचे दिसून येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

गोवा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक !

हे ही वाचा –

गोवा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर सेवेतून निलंबित
https://sanatanprabhat.org/marathi/719387.html

विद्यालयांतून इस्‍लामीकरण !
संपादकीय
https://sanatanprabhat.org/marathi/719463.html