आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरेंसह १४ नावांचा समावेश !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ सहस्र कोटी रुपयांच्या अपव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पुरवणी आरोपपत्रात १४ जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?

मुंबईमध्ये माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या !

शिवसेनेचे घाटकोपर येथील माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी लोकलगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार या स्थानकांच्या मधल्या मार्गावर हा प्रकार घडला. ३१ ऑगस्टच्या रात्री मोरे यांचा मृतदेह रेल्वेमार्गावर सापडला.

नाशिक येथे महिला पोलिसांकडून अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त !

नाशिक महिला पोलिसांनी गावागावांतील अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, तर एकूण ३३ आरोपींविरुद्ध मुंबई मद्यबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ९४ सहस्र १७० रुपयांचे गावठी हातभट्टीचे मद्य, रसायन आणि इतर साहित्य साधने जप्त करण्यात आली आहेत.

पेठ शिवापूर (तालुका पाटण) येथील अनधिकृत मदरशाचे बांधकाम तात्काळ बंद करावे ! – महिंद ग्रामस्थांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? कि प्रशासनाचा याला पाठिंबा आहे, असा अर्थ काढायचा का ?

मुंबई येथे ‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण !

उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राज्यपाल श्री. रमेश बैस, कामगारमंत्री श्री. सुरेश खाडे, नौदलाचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी ५ शासकीय अधिकार्‍यांना १ मास कारावासाची शिक्षा !

पुणे येथील भामा आसखेड प्रकल्पातील काही जागा सरकारने राखीव ठेवल्या होत्या. ‘या भूमी ६ मासांत संपादित करा किंवा त्यावरील ‘राखीव’ हा ‘टॅग’ हटवा’, असा न्यायालयाने यापूर्वी आदेश दिला होता; मात्र यापैकी कोणतीही कृती अधिकार्‍यांनी केली नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले, ते देशासाठीच ! – रणजित सावरकर (स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांची क्षमा कधीच मागितली नाही. स्वतःसह सर्व क्रांतिवीरांच्या सुटकेचे अर्ज त्यांनी सिद्ध केले होते;

भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळाले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्‍वसार्हता संपेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा आणि पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अशा वेळी जर भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्‍वासार्हर्ता संपेल.

सद्गुणांचा विकास हे राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य ! – आनंद जाखोटिया

आयुष्यात सतत आनंदी रहाण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो; पण जेव्हा तणाव किंवा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण परिस्थितीकडे किंवा इतरांच्या वाईट वृत्तींकडे पहातो.