राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

‘‘अंगणवाडी, शिशु गट, वरिष्ठ शिशु गट, पहिली आणि दुसरी अशी ५ वर्षे ‘प्री-प्रायमरी’मध्ये घेतली जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी माहिती मागवली जात आहे.

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी (आधुनिक इलेक्ट्रॉनिक ध्वनीक्षेपक यंत्रणा) ध्वनीवर्धक, ढोल-ताशांच्या आवाजाने ध्वनीप्रदूषणाची पातळी ओलांडली.

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मारामारी !

सहकारनगरमधील तळजाई भागात जुन्या वादातून ‘शेंडी’ आणि ‘सूर्या’ टोळींमध्ये मारामारी झाली.

पिंपरी-चिंचवड येथे बालकाचा मृत्यू !

मोशी येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन चालू असतांना अर्णव आशिष पाटील या ४ वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे केवळ ३ वर्षांसाठी दिली जाणार !

ही वाघनखे नोव्हेंबरमध्ये मुंबईत आणली जातील. ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, तसेच सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथील संग्रहालयांत प्रदर्शित केली जाणार आहेत.

हिंदूंनो, हिंदुत्वाच्या हितासाठी स्वत: कार्य करा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

एक समाज असा आहे, जो आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरवतो. सत्तेत हिंदू असूनही या लोकांच्या विचाराने सरकार चालते. आपला देश कुणी आतंकवादी चालवत नाहीत, तरीही हिंदुविरोधी भूमिका का घेतली जाते ? मंदिरांचे सरकारीकरण कुणी केले आहे ? सरकार मशिदी कह्यात का घेत नाहीत ?

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे जावेद याने ‘बाबा बोधेश्‍वर महादेव मंदिरा’त घुसून ३ श्रद्धाळूंवर लाठीने केले आक्रमण !

आता हिंदू रस्त्यावरच नव्हे, तर मंदिरातही असुरक्षित आहेत, असेच ही घटना दर्शवते ! धर्मांध मुसलमानांचे नसते लाड पुरवल्यानेच ते कायदा-सुव्यवस्थेला जुमानत नाहीत !

जयपूर (राजस्थान) येथे २ दुचाकीस्वारांमधील अपघातानंतर जमावाने एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू

दोन दुचाकींमध्ये टक्कर झाल्यानंतर जमावाने यांतील एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कॅनडा आरोपांविषयी माहिती देत असेल, तर भारत चर्चेला सिद्ध ! – डॉ. जयशंकर

कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.

ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याची मुसलमान पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली

‘हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.