उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘सनातन धर्मा’ची डेंग्‍यू, मलेरिया, कोरोना, एड्‍स आणि कुष्‍ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांना त्‍वरित अटक करण्‍यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्‍हाण यांना देण्‍यात आले. 

गणेशोत्‍सवानिमित्त खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’द्वारे होणारी प्रवाशांची लूटमार थांबवावी !

गणेशोत्‍सवानिमित्त लाखो गणेशभक्‍त स्‍वत:च्‍या गावी जाण्‍यासाठी निघत आहेत. याची संधी साधत ‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’ आणि अन्‍य खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’ यांच्‍याद्वारे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्‍त तथा प्रवाशांची लूटमार चालू आहे.

‘मुक्‍तीसंग्राम – गाथा मराठवाड्याच्‍या संघर्षाची’ चित्रपट प्रदर्शित !

मराठवाडा मुक्‍तीदिनाच्‍या निमित्ताने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते १६ सप्‍टेंबर या दिवशी या चित्रपटाचे लोकार्पण करण्‍यात आले.

नागपूर येथे काश्‍मीरमधून आलेल्‍या शिक्षिकेच्‍या घरी धाड !

शहरातील नरेंद्रनगर येथे भाड्याच्‍या घरात रहाणार्‍या शिक्षिकेच्‍या घरावर देहली येथील केंद्रीय अन्‍वेषण विभागाच्‍या अधिकार्‍यांनी धाड घातली. काश्‍मीरमधील १ महिला काही वर्षांपूर्वी नागपूर येथे रहायला आली होती.

४ नवीन शाळांसह ५ शाळांच्‍या दर्जा वाढीला शासनाकडून अनुमती ! – आयुक्‍त राजेश नार्वेकर

राज्‍यशासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेला ४ नवीन शाळांसह ५ शाळांच्‍या दर्जा वाढीला अनुमती देण्‍यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी दिली.

शिवकालीन किल्‍ल्‍यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवा ! – रमेश बैस, राज्‍यपाल

महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचे रक्षण करण्‍यासाठीच या किल्‍ल्‍यांची निर्मिती झाली आहे. त्‍यामुळे येणार्‍या पिढीला गड-दुर्ग प्रेरणा देतील. त्‍यामुळे या किल्‍ल्‍यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवायला हवा; जेणेकरून त्‍यांच्‍यामध्‍ये स्‍वाभिमानाची भावना निर्माण होईल, असे आवाहन राज्‍यपाल रमेश बैस यांनी केले.

तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणामुळे मागील ७५ वर्षे तेलंगाणा मुक्‍ती दिन साजरा केला नाही ! – अमित शहा, गृहमंत्री

केंद्रीय गृहमंंत्री अमित शहा हे सिकंदराबाद येथे तेलंगाणा मुक्‍ती दिनाच्‍या निमित्ताने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमामध्‍ये सहभागी झाले.

श्री तुळजाभवानीदेवीचे पुरातन दागिने गहाळ झाल्‍याच्‍या प्रकरणी खुलासा सादर करण्‍याचा जिल्‍हाधिकार्‍यांचा आदेश !

महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्‍या खजिन्‍यातील पुरातन दागिने मोजण्‍याच्‍या प्रकरणी येत्‍या सप्‍ताहात अंतिम अहवाल येण्‍याची शक्‍यता आहे. श्री तुळजाभवानीदेवीचे पुरातन दागिने गहाळ झाल्‍याच्‍या प्रकरणी एका महंतांसह तत्‍कालीन धार्मिक व्‍यवस्‍थापक आणि अन्‍य मानकरी यांना अंतिम खुलासा सादर करण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे.

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांनी छेड काढल्यामुळे झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

अल्पसंख्यांक असलेले सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! याविषयी देशातील एकही राजकीय पक्ष, नेते, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवीन संसद भवनाच्या प्रांगणात फडकावण्यात आला राष्ट्रध्वज !

१९ सप्टेंबरला श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी संसद जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत हालवण्यात येणार आहे. या दिवसापासूनच नवीन इमारतीत कामकाजाला प्रारंभ होणार आहे.