स्वच्छतागृहाच्या बाहेर असलेले औदुंबराचे झाड स्थलांतरित करण्याची भाविकांनी मागणी !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात नुकतेच नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाच्या बाहेर औदुंबराचे झाड असून त्याच्या बाहेर संरक्षक भिंत आहे. ‘औदुंबरामध्ये श्री दत्ततत्त्व असते. त्यामुळे भाविकांकडून हे झाड स्थलांतरित करण्यात यावे’, अशी मागणी करण्यात येत आहे.

नाशिकचे प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण !

इंदिरानगर येथे २ सप्टेंबरच्या रात्री ९.४५ वाजता येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गुंडांनी त्यांच्या घरासमोरून अपहरण केले आहे. हे गुंड चारचाकीतून आणि दुचाकीवरून आले होते. त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत ढकलले आणि सुसाट वेगाने पळून गेले. अपहरणामागील कारण समजलेले नाही. 

जालना येथील प्रकरणात पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करू ! – वैभव फडतरे, मराठा उद्योजक लॉबी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

जालना येथे उपोषणकर्त्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून लाठीमार करून उलट त्यांच्यावरच गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील हे गुन्हे मागे घेऊन पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ‘मराठा उद्योजक लॉबी’चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वैभव फडतरे यांनी वाशी येथे दिली आहे. 

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद !

आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, सुनिल कदम, महापालिकेचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त, ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’चे राजीव साळुंखे, ‘फोर्सवन मल्टी सर्व्हिसेस’चे भागीदार आणि कर्मचारी, ‘स्नेहा कॅटरर्स’चे भागीदार, महापालिकेचे अधिकारी या सर्वांचा या गुन्ह्यात उल्लेख केला आहे. हा घोटाळा अनुमाने ६ कोटी ३७ लाख रुपयांचा असल्याचे अन्वेषणामध्ये समोर आले आहे.

१५ लाखांची खंडणी मागणार्‍या पुणे येथील पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा नोंद !

पोलिसांचेच वर्तन असे असेल, तर कुणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाईल का ? स्वतः लाच घेणारे पोलीस समाजात होणारी लाचखोरी आणि लूट कशी रोखणार ?

लोकसभेच्या विशेष अधिवेशनात ‘एक देश-एक निवडणूक’ हे विधेयक आल्यास त्याचा सर्वांनाच लाभ ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

१८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत लोकसभेचे विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ‘एक देश-एक निवडणूक’ हे विधेयक येणार असल्याची चर्चा आहे. या विधेयकाचे मी स्वागत करतो आणि हे विधेयक आल्यास त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या युवतीवर गुन्हा नोंद !

सामाजिक माध्यमाद्वारे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासह हिंदु देवतेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील अल्पसंख्य समाजातील एका युवतीवर गुन्हा नोंद केला आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या तत्कालीन शिक्षण अधिकारी सुनीता धनगर घरात सापडली ९६ लाख ४३ सहस्र रुपयांची बेहिशेबी रक्कम : गुन्हा नोंद !

सुनीता धनगर सारखे अधिकारी शिक्षण क्षेत्रासाठी कलंक असल्याने त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !

बावळाट येथे १८ गोवंशियांची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली !

गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या गोतस्करांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या गोतस्करांवर वचक बसणार नाही !

(म्हणे) ‘भारतात मुसलमान आहेत, म्हणून तुम्ही हिंदू आहात !’-अभिनेते किरण माने

एकीकडे पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंची स्थिती विदारक आहे, तर दुसरीकडे भारतातील धर्मांध मुसलमान उद्दाम बनले आहेत. याकडे असे अभिनेते कानाडोळा का करतात ?