‘हिंदु सेवा महोत्सवा’च्या समारंभामध्ये विविध मान्यवरांनी दिलेल्या भेटी !

विश्व हिंदु परिषदेचे प्रांतप्रमुख पू. दादा वेदक (मध्यभागी) यांची कक्षाला भेट
भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रीतम चेतन मुनी (मध्यभागी उभे असलेले)
कक्षावर असलेले ग्रंथ उत्सुकतेने पहाताना ‘मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल’च्या विद्यार्थिनी

पुणे – ‘भाजप युवा मोर्चा’चे उपाध्यक्ष प्रीतम चेतन मुनी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला भेट दिली. त्यांच्याकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दायित्व आहे. त्यांनी महिलांचे धर्मांतर रोखणे, बांगलादेशी हिंदूंसाठी आंदोलन करणे यांसाठी प्रयत्न केला आहे. ‘खडकवासला मोहीम, तसेच अन्य उपक्रमांत कोणतेही साहाय्य लागले तर सांगा’, असे ते म्हणाले.