भाजपच्‍या वतीने श्री अष्‍टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन !

सिहोर, मध्‍यप्रदेश येथील प.पू. पंडित श्री प्रदीप मिश्रा यांनी सर्व भाविकांना कार्यक्रमाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम सांगवी, पिंपरी-चिंचवड येथील पीडब्‍ल्‍यूडी मैदान येथे होणार आहे.

सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पं. केशव गिंडे यांना शास्‍त्रीय संगीताचा पुरस्‍कार घोषित !

‘गानवर्धन संस्‍था, पुणे’ आणि ‘तात्‍यासाहेब नातू फाऊंडेशन’च्‍या यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ बासरीवादक, संशोधक आणि विचारवंत पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्‍वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्‍त्रीय संगीत पुरस्‍कार’ प्रदान करण्‍यात येणार आहे

मंदिरांचा पैसा लुटून जिहाद्यांना पुरवण्याचा डाव उघड !

केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैन्याच्या श्‍वानाला वीरमरण !

आतापर्यंत या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले आहेत, तर सुरक्षादलाचे २ अधिकारी घायाळ झाले आहेत.

तालिबानमधील गटबाजीमुळे अफगाणिस्तानची गृहयुद्धाकडे वाटचाल !

अमेरिकेनी कुठलाही विचार न करता घाईघाईने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेऊन मोठी चूक केली असे माजी सैनिकी कमांडर लेफ्टनंट जनरल हैबतुल्ला अलीझाई यांनी सांगितले

मुलांना उपाहारागृहातून मागवलेल्या जेवणापेक्षा घरी बनवलेले जेवण द्या ! – केरळ उच्च न्यायालय

मैदानात खेळून घरी आल्यानंतर मुलांना आईने बनवलेल्या भोजनाचा सुगंध घेता येऊ दे. आम्ही याविषयीचा निर्णय मुलांच्या माता-पित्यांवर सोपवतो.

ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर आक्रमण करणार्‍या १९ खलिस्तान्यांची ओळख पटली !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे पथक कॅनडाला जाणार !

मंदिराच्या पायर्‍यांवर लावली उदयनिधी यांची छायाचित्रे !

ज्या व्यक्तीला सनातन धर्माविषयी इतका द्वेष आहे, त्या व्यक्तीची छायाचित्रे मंदिराच्या पायर्‍यांवर लावण्याइतकीही तिची पात्रता नाही !

समाजवादी पक्षाचा नेता आझम खान याच्या ३० ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी

आयकर विभागाच्या या धाडी आझम खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या काही विश्‍वस्त मंडळांशी संबंधित आहेत. या विश्‍वस्त मंडळांवर कर चुकवेगिरीचे आरोप आहेत.

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी चलनावर बंदी येणार !

सेंट्रल बँकेने कंधार, उरुजगन, हेलमंद, जाबुल आणि डायकुंडी प्रांतातील लोकांना चेतावणी दिली आहे की, केवळ राष्ट्रीय चलनाद्वारेच व्यवहार करण्यात यावा.