न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या ५४ व्या मानवाधिकार परिषदेमध्ये भारताने माहिती देतांना सांगितले की, आम्ही अफगाणिस्तानमध्ये ५० सहस्र मेट्रिक टन धान्य, २८ टन आपत्कालीन साहाय्य साहित्य, २०० टन औषधे, लस आणि अन्य वैद्यकीय साहित्य पाठवले आहे. तसेच ११ सहस्र महिलांच्या आरोग्याच्या संदर्भातील साहित्य अफगाणिस्तानच्या महिला पुनर्वसन केंद्रांना पाठवले आहेत.
तालिबान और पाकिस्तान में तनातनी के बीच भारत की अफगानिस्तान को बड़ी मदद, कही ये बात#India #afganistan https://t.co/286N0TT6aJ
— India TV (@indiatvnews) September 12, 2023
भारताने सांगितले की, भारत अफगाणिस्तानचा शेजारी असून त्याच्या विकासामध्ये भागीदार आहे. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संस्कृती आहे. आम्ही अफगाणिस्तानमध्ये शांततेचे आणि स्थैर्याचे समर्थक आहोत.
संपादकीय भूमिकाभारत एक हिंदूबहुल देश आहे आणि तो मुसलमानबहुल अफगाणिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र या देशात किती हिंदू शिल्लक आहेत ? या देशातील तालिबानी तेथील मुसलमानांनाही अमानुषपणे वागवत आहेत. अशा वेळी हिंदूंसाठी अफगाणिस्तान उपयोगाचा नाही ! |