श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर १ सहस्र संत ५ लाख हिंदूबहुल गावांत जाऊन कार्यक्रम करणार !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देशातील १२७ पंथांचे संत एकत्र आले आहेत. अखिल भारतीय संत समिती आणि आखाडा परिषद  नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ‘हर मंदिर, राममंदिर’ आणि ‘संत चले गाव की ओर’ कार्यक्रम प्रारंभ करणार आहे. यात देशाच्या ४०० जिल्ह्यांतील ४९५ महामंडलेश्‍वरांसह १ सहस्रांहून अधिक संत हिंदु लोकसंख्या अधिक असलेल्या सुमारे ५ लाख गावांमध्ये जाऊन विविध कार्यक्रम घेणार आहेत.

आयोजकांनी म्हटले की, देशातील ५५० जिल्हे आणि ५ लाख गावांमध्ये हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे. आम्ही केवळ त्यांच्यापर्यंत पोचू इच्छितो. ग्रामस्थांना श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशातील सर्व ९ लाख मंदिरे सजवण्याचे आवाहन केले जाईल.