तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा ! – श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्यभूमी आहे. नवीन संसदेमध्ये नेण्यात आलेला ‘सांगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्यात आला.

अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल

जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही भूमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील.

शीख, जैन, बौद्ध यांनी ‘हिंदु’ आहोत, हे समजून घ्यायला हवे ! – कर्नल करतार सिंह मजीठिया, कृपाल रूहानी फाऊंडेशन, गोवा

धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना कुणावरही अवलंबून रहाता येणार नाही. हिंदु धर्म आणि मंदिरे यांवर आक्रमण करणार्‍यांना हिंदूंनी सोडू नये. हिंदूंनी कुणावर आक्रमण करू नये; मात्र स्वत:च्या रक्षणासाठी हिंदूंना सिद्ध रहायला हवे.

वीरशैव लिंगायत हे हिंदूच ! – पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, मठाधिपति, गणाचार्य मठ संस्थान, मुखेड, नांदेड, महाराष्ट्र

अखंड हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्रच आहे; परंतु त्याला ‘सेक्युलर’ ठरवले जात आहे. भारतातील संप्रदाय हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतात. त्यामुळे सर्व जण हिंदूच आहेत.

‘हलाल’मधून हिंदूंचा पैसा आतंकवादी कारवायांसाठी जात आहे ! – कपिल मिश्रा, संस्थापक, हिंदु ईकोसिस्टम

‘हलाल’च्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधात ‘अर्थव्यवस्था’ निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्र आणि हिंदु धर्मविरोधी शक्तींचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. या संकटाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी जातींमधील भेद विसरून एकत्र यायला हवे.

गोवा : कोकणी माध्यमातील इयत्ता १ लीच्या पाठ्यपुस्तकात हिंदूंसाठी धक्कादायक प्रकार ! 

शिक्षण खाते पाठ्यपुस्तके पडताळत नाही का ? असे प्रकार काँग्रेसच्या काळात होत असत. भाजपच्या राज्यात असे अपेक्षित नाही !

गोवा : जमावाकडून अनधिकृत मदरसा, वाहने आणि गोमांस विक्रीची दुकाने यांवर दगडफेक करून प्रत्युत्तर !

पंचायत क्षेत्रात पंचायतीच्या अनुज्ञप्तीविना बांधकामे चालू आहेत आणि ती बंद करण्यास पंचायत काहीच पुढाकार घेत नाही. सरकारने याची नोंद घेऊन पंचायत विसर्जित करावी, अशी मागणी रूमडामळ येथील पंच विनायक वळवईकर यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक नसलेल्या शाळेत लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक

साक्षरतेचे प्रमाण अधिक अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही स्थिती लाजिरवाणी ! लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक होणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

‘एम्.पी.टी.’वर नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ! – डॉ. एम्. बीना

डॉ. एम्. बीना पुढे म्हणाल्या, ‘‘पश्चिम किनार्‍यावरील मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा, कन्नूर कोझिकोड या मार्गावरील क्रूझ सेवेला नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रारंभ होत आहे. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे.’’

पुणे येथे २ वेगवेगळ्‍या ठिकाणी गोरक्षकांच्‍या सतर्कतेमुळे गोमांस वाहतूक करणारे कह्यात !

दुसर्‍या एका प्रकरणात १७ जून या दिवशी जनवाडी गोखलेनगरमध्‍ये गोमांस विक्री चालू असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर गोरक्षकांनी कसायाला पकडले. त्‍या वेळी त्‍याने मुसलमानांचा जमाव एकत्रित करण्‍यास चालू केले. तेव्‍हा गोरक्षकांनी जनवाडी पोलिसांचे साहाय्‍य घेऊन गोमांसाने भरलेली गोणी उघडली. त्‍यामध्‍ये गायीचे तोंड, धड, पाय आढळून आले.