BJP Donation 2023-24 : भाजपला वर्ष २०२३-२४ मध्ये मिळाल्या २ सहस्र २४४ कोटी रुपयांच्या देणग्या

नवी देहली – भारतीय जनता पक्षाला वर्ष २०२३-२०२४ मध्ये २ सहस्र २४४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. वर्ष २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणग्यांपेक्षा ही रक्कम तिप्पट आहे. दुसरीकडे काँग्रेसला वर्ष २०२२-२०२४ मध्ये ७९ कोटी ९० लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. ज्यात वर्ष २०२३-२०२४ मध्ये वाढ होऊन तिला २८८ कोटी ९० लाख इतक्या देणग्या मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.

भाजपला एकूण मिळालेल्या देणग्यांपैकी ८५० कोटी रुपये ‘इलेक्टोरल ट्रस्ट’च्या माध्यमातून मिळालेले आहेत. यामध्ये ‘प्रुडंट ट्रस्ट’कडून ७२३ कोटी रुपये, ‘ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्ट’कडून १२७ कोटी रुपये आणि ‘एनझिगार्टिंग इलेक्टोरल ट्रस्ट’कडून १७ कोटी २० लाख रुपये यांचा समावेश आहे. दुसरीकडे काँग्रेसला ट्रस्टच्या माध्यमातून १५६ कोटी रुपये मिळाले, असे असले तरी ‘प्रुडंट ट्रस्ट’ त्यांचा एकमेव देणगीदार होता.