राज्यातील सहस्रो शाळांत दीड वर्षापासून वीजच नाही !
महाराष्ट्र सरकारच्या स्वतःच्या ६५ सहस्र आणि अनुदानित २५ सहस्र शाळा मिळून अनुमाने ९० सहस्र शाळांमध्ये वीज, पाणी आणि प्रसाधनगृह यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
महाराष्ट्र सरकारच्या स्वतःच्या ६५ सहस्र आणि अनुदानित २५ सहस्र शाळा मिळून अनुमाने ९० सहस्र शाळांमध्ये वीज, पाणी आणि प्रसाधनगृह यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने विटा (जिल्हा सांगली) येथे प्रशांत आणि स्वाती कांबळे या दांपत्याने ‘फेसबुक लाईव्ह’ करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
वासनांध आणि क्रूर धर्मांध ! केरळमध्ये मुसलमाधार्जिणे डाव्यांचे सरकार असल्यामुळे आरोपीवर कारवाई होणे कदापि शक्य नाही, हेही तितकेच सत्य आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
वांद्रे-वरळी सागरी लिंकवरून एका व्यक्तीने आपली गाडी तेथे थांबवून समुद्रात उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांनी शोध मोहीम चालू केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांच्या ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न करणारा चालक जी.पी. रझाक याला वांद्रे पोलिसांनी नुकतीच अटक केली.
येथील गौरीपाडा भागातील तलावात गेल्या दोन दिवसांपासून शेकडो मासे मृत पावले आहेत. मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या भागातील प्रदूषित पाणी तलावात शिरल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
मुंबई अग्नीशमन दलाच्या ताफ्यात लवकरच आणखी दोन यंत्रमानव (फायर रोबो) भरती होणार आहेत. जेथे मनुष्य पोचू शकत नाही, अशा अत्यंत धोकादायक ठिकाणी ‘रिमोट कंट्रोल’ने या यंत्रमानवांच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम करता येईल.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे पाश्चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, तसेच रशियावर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी भारतावरही दबाव आणला. आता युक्रेनकडून रशियावर आक्रमण केले जात असतांना मूग गिळून गप्प बसणार्या पाश्चात्त्य देशांना भारताने आरसा दाखवला पाहिजे !
‘श्री रामधाम रामायण मंडळ ट्रस्ट’च्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत ‘आम्ही ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असे वक्तव्य करून भारताच्या राष्ट्रीय गीताचा घोर अवमान केला आहे.