मेंढ्यांनी स्‍वतःहून घातले शिव चिदंबर महाराजांच्‍या दिंडीला अनोखे रिंगण; वारकरीही झाले अवाक !

पंढरपूरच्‍या विठोबाच्‍या दर्शनाला निघालेल्‍या माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्‍या पालख्‍यांना मेंढ्यांचे रिंगण घातले जाते. हे रिंगण घालण्‍यासाठी त्‍या-त्‍या ठिकाणी सूत्रबद्ध पद्धतीने मेंढ्यांना आणले जाते.

राज ठाकरे यांना वाढदिवसाला कार्यकर्त्‍यांकडून अनोखी भेट !

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांना १४ जून या दिवशी त्‍यांच्‍या वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्‍याने चक्‍क औरंगजेब अन् मशिदीवरील भोंग्‍याचे चित्र आणि त्‍यावर फुली मारलेला केक भेट दिला.

वारकर्‍यांवर लाठीमार प्रकरणी कुणीही राजकारण करू नये ! – आळंदी देवस्‍थान

आनंदाच्‍या सोहळ्‍याला गालबोट लागले आहे. १२ जूनला घडलेल्‍या घटनेत आळंदी देवस्‍थानाचा संबंध नव्‍हता. हा प्रकार अपसमजातून झाला आहे. एकूण ४७ दिंड्या आहेत, त्‍यामधील ७५ वारकर्‍यांना ‘पास’ दिले होते. वारकरी शिक्षण संस्‍थेतील मुलांनाही देवस्‍थानचे पास दिले होते; मात्र अधिक संख्‍या असल्‍याने त्‍यांनी हट्ट केला. मुले वारकरी म्‍हणून हट्ट करत होती आणि कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी पोलीस काम करत होते.

जगद़्‍गुरु तुकाराम महाराजांची पालखी १५ जूनला यवत, तर १६ जूनला वरवंड येथे मुक्‍कामी !

जगद़्‍गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी १५ जूनला दौंड तालुक्‍यात प्रवेश करत आहे. १५ जूनला पहिला मुक्‍काम यवत, तर १६ जूनला दुसरा मुक्‍काम वरवंड या ठिकाणी आहे. या वेळी पालखी सोबत असणार्‍या भाविक आणि वारकरी यांच्‍या स्‍वागतासाठी यवतकर आणि वरवंडकर यांनी जय्‍यत सिद्धता केली आहे.

१४ वर्षीय अल्‍पवयीन मुलीवर ५० वेळा अत्‍याचार झाल्‍याची वैद्यकीय पडताळणीतील माहिती !

मुलींवर अत्‍याचार करणार्‍यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शासनकाळात असलेली चौरंगा करण्‍याची शिक्षा करण्‍याची मागणी कुणी केल्‍यास आश्‍चर्य वाटू नये. छत्रपतींच्‍या महाराष्‍ट्रात मुलींवर अत्‍याचारांची परिसीमा गाठणे लज्‍जास्‍पद !

पुणे येथील पोलीस चौकीत उपनिरीक्षकाला मारहाण !

किरकोळ वादातून कात्रज पोलीस चौकीतील उपनिरीक्षक नितीन जाधव यांना धक्‍काबुक्‍की केल्‍याप्रकरणी प्रीतम परदेशी आणि त्‍यांची आई सुजाता परदेशी यांना अटक करण्‍यात आली आहे.

दौंड (पुणे) येथे पशूवधगृहावर टाकलेल्‍या धाडीत १६ गोवंश आणि चरबीपासून सिद्ध केलेले बनावट तूप जप्‍त !

ईदगाह मैदान शेजारी खाटीक गल्लीतील पशूवधगृहाशेजारी जनावरे, गोवंश कत्तलीसाठी ठेवले आहेत, अशी माहिती १० जून या दिवशी प्राणिमित्रांना मिळाली. त्‍यांनी पुणे जिल्‍हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना ही माहिती दिली

अचलपूर (जिल्‍हा अमरावती) येथे महाविद्यालयातील फलकावर हिंदु धर्मविरोधी सुविचार !

धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदू संघटित नसल्‍याने हिंदु धर्मावर कुणीही येतो आणि सर्रास चिखलफेक करतो. अन्‍य धर्मियांच्‍या संदर्भात असे लिखाण करण्‍याचे कुणाचे धाडसही होणार नाही !