गर्भलिंग निदान चाचणीसाठी १५ सहस्र रुपये घेतांना रुग्‍णालय व्‍यवस्‍थापकास पकडले !

राजारामपुरी परिसरातील ‘श्री’ रुग्‍णालयावर महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाने १२ जून या दिवशी धाड टाकली. या प्रसंगी रुग्‍णालयाच्‍या व्‍यवस्‍थापकास गर्भलिंग निदान चाचणीसाठी १५ सहस्र रुपये घेतांना रंगेहात पकडण्‍यात आले.

‘शासन आपल्‍या दारी’ उपक्रम १३ जूनला दुपारी ४ वाजता तपोवन मैदान येथे होणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्‍हापूर

‘शासन आपल्‍या दारी’ हा उपक्रम १३ जूनला दुपारी ४ वाजता तपोवन मैदान येथे होणार असून या उपक्रमासाठी जिल्‍ह्यातील ४० सहस्र लाभार्थी उपस्‍थित रहाणार आहेत. तरी यातील एकाही लाभार्थ्‍याची गैरसोय होऊ नये यांसाठी प्रशासनाने अल्‍पाहार, पाणी, भोजन, वाहतूक, आरोग्‍य पथक यांसह सर्व सोयी उपलब्‍ध करून द्याव्‍यात, असे निर्देश शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

कायदा करण्यासह ‘लव्ह जिहाद’ची चर्चा घरोघरी व्हायला हवी ! – अधिवक्त्या मणी मित्तल, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन विशेष संवाद’ : ‘साक्षी, श्रद्धा… कधीपर्यंत ‘लव्ह जिहाद’मध्ये हत्या होत रहाणार

गोडसे यांच्‍या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले ! – अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते

एस्.टी. कर्मचार्‍यांच्‍या स्‍टेट ट्रान्‍सपोर्ट को-ऑपरेटिव्‍ह बँकेच्‍या निवडणुकीत सदावर्ते यांच्‍या संघटनेचे पॅनल उतरले आहे. त्‍याची माहिती देण्‍यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्‍यात आली होती. त्‍या वेळी ते बोलत होते.

नथुरामचा कबुली जबाब का जाळला ? – शरद पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेते

नथुरामचा कबुली जबाब का जाळला गेला ? नथुराम गोडसेने जेव्‍हा पहिल्‍या दिवशी त्‍यांची जबानी दिली आणि न्‍यायाधीश तिथून निघून गेले. त्‍यानंतर तिथे उपस्‍थित असलेले पत्रकार जेव्‍हा बाहेर आले, तेव्‍हा त्‍यांच्‍यावर पोलिसांनी आक्रमण केले, त्‍यांना घेराव घातला. त्‍यांच्‍याजवळ असलेली सगळी कागदपत्रे, नथुरामचा जबाब हिसकावून घेण्‍यात आला.

कोल्‍हापूर येथील सनातनच्‍या साधकांचे १२ वीच्‍या परीक्षेत सुयश !

या संदर्भात कु. राज म्‍हणाला, ‘‘शाळेत शिक्षक शिकवत असतांना साक्षात् गुरुदेव आणि श्री सरस्‍वतीदेवी शिकवत आहे’, असा भाव ठेवला. याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. प्रासंगिक सेवांमध्‍ये सहभागी होतो. त्‍यात फलक लिखाण, साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या वितरणाची सेवा केली.’’ आपल्‍या यशाविषयी कु. श्रावणी करी म्‍हणाली, ‘‘मी प्रतिदिन प्रार्थनेसमवेत ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करत असे. त्‍याचा लाभ झाला.

पालखी प्रस्‍थानानंतर देहूमध्‍ये स्‍वच्‍छता कर्मचार्‍यांनी केली त्‍वरित स्‍वच्‍छता !

संत तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान ११ जून या दिवशी येथून झाल्‍यानंतर गावातील कचर्‍याची त्‍वरित स्‍वच्‍छता करण्‍यात आली. या वेळी १४ टन ओला कचरा, तर ६५० किलो प्‍लास्‍टिक कचरा जमा करण्‍यात आला.

जुहू (मुंबई) येथील समुद्रात ६ जण बुडाले, २ जणांना वाचवण्‍यात यश !

मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात ६ जण बुडाल्‍याची दुर्घटना घडली. त्‍यापैकी २ जणांना वाचवण्‍यात स्‍थानिकांना यश मिळाले. १२ जून या दिवशी सायंकाळी ५.३० वाजताच्‍या कालावधीत ही दुर्घटना घडली. अद्याप ४ जण मात्र सापडलेले नाहीत. त्‍यांची शोधमोहिम चालू आहे.

श्री विठ्ठल नामाच्‍या जयघोषात संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्‍या पालख्‍यांचे पुणे शहरात आगमन !

पंढरपूरकडे निघालेल्‍या संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्‍या पालख्‍यांचे पुणे येथे १२ जून या दिवशी सायंकाळी आगमन झाले.

कायद्याचे उल्लंघन करणार्‍या दोषी वाहनधारकांकडून ६८ लाख ५९ सहस्र ३६६ रुपयांचा दंड वसूल !

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या वतीने १ ते ३१ मे या कालावधीत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ५ सहस्र ६८९ दोषी वाहनांवर कारवाई करण्‍यात आली आहे.