कलम ३७० हटवूनही काश्‍मीरमध्‍ये हिंदू सुरक्षित नाहीत !- राहुल कौल, अध्‍यक्ष, यूथ फॉर पनून कश्‍मीर, पुणे

अद्यापही सरकार काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार मान्‍य करायला सिद्ध नाही. त्‍याचा परिणाम म्‍हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्‍मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्‍मीरमधील नरसंहार मान्‍य केला जात नाही, तोपर्यंत काश्‍मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्‍य नाही.

छत्रपती संभाजीनगर येथील १ सहस्र ५६८ कारखान्‍यांतील विषारी पाणी थेट नाल्‍यांत !

यामुळे भूमीतील जलस्रोत दूषित होत आहेत. याकडे महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्‍याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

श्रीरामपूर (नगर) येथे वाळू तस्‍करांचा महसूल पथकाला चिरडण्‍याचा प्रयत्न !

सरला गोवर्धन परिसरामध्‍ये वाळू तस्‍करांवर कारवाईसाठी गेलेल्‍या महसूल आणि पोलीस पथकांवर वाहने घालून त्‍यांना चिरडण्‍याचा प्रयत्न केला.

‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या गुन्‍ह्यांवर पोलीस यंत्रणेने तात्‍काळ कारवाई केली पाहिजे !

‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. अशा स्‍वरूपाच्‍या घटना समाजामध्‍ये मोठ्या प्रमाणामध्‍ये घडत आहेत. या तक्रारींवर पोलिसांनी तात्‍काळ कारवाई केली पाहिजे; परंतु दुर्दैवाने पोलीस यंत्रणा याकडे गांभीर्याने पहात नाही.

भारतात असा कायदा केव्‍हा होणार ?

इटली सरकारने मशिदींच्‍या बाहेर सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्‍यावर बंदी घालण्‍याचा कायदा करण्‍यासाठी एक प्रारूप बनवले आहे. सरकारने धर्मांतराच्‍या विरोधात कायदा करण्‍यासाठीही त्‍याचे प्रारूप बनवले आहे.

जळगाव येथे आंदोलनाआधी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नेत्‍या रोहिणी खडसे पोलिसांच्‍या कह्यात !

राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या २७ जून या दिवशी शहरातील दौर्‍याच्‍या आधी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या रोहिणी खडसे यांच्‍यासह पदाधिकार्‍यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

आजचा वाढदिवस : कु. कृष्‍ण राघवेंद्र आचार्य

आषाढ शुक्‍ल दशमी (२८.६.२०२३) या दिवशी कु. कृष्‍ण राघवेंद्र आचार्य याचा १५ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍याचे वडील श्री. राघवेंद्र आचार्य यांना कृष्‍ण आचार्य याची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि जाणवलेले पालट लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

जळगाव येथे इन्‍स्‍टाग्रामवरून आक्षेपार्ह माहिती प्रसारित केल्‍याने एकावर गुन्‍हा नोंद !

राजकीय पदाधिकार्‍याविषयी सामाजिक माध्‍यमांतील इन्‍स्‍टाग्रामवर आक्षेपार्ह माहिती पोस्‍ट केल्‍याप्रकरणी येथील समर्थ शिकवणी वर्गाचे संचालक दीपक पाटील (वय २५ वर्षे) यांच्‍याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्‍यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या बंदला व्‍यावसायिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

आंबेगाव तालुका येथील सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २४ जून या दिवशी असलेल्‍या मंचर शहर बंदला व्‍यवसायिकांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. या बंदमधून अत्‍यावश्‍यक सेवा वगळल्‍या होत्‍या.