बोगस वारस दाखल्यांचे वाटप करणार्‍या न्यायालयातील लिपिकाला अटक !

पनवेल येथील प्रकार

प्रतिकात्मक चित्र

पनवेल – न्यायालयात सुनावणीसाठी प्रविष्ट केलेल्या वारस दाखल्यांच्या दाव्यांमध्ये न्यायालयातील लिपिकाने बोगस वारस दाखल्यांचे वाटप केले. या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ८० बोगस दाखले दिल्याचे मान्य केले. मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेत महत्त्वाचा पुरावा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या वारस दाखल्यांमध्ये फेरफार करण्यात आले. या प्रकरणातील पहिला संशयित आरोपी दीपक फड याला अटक करण्यात आली असून तो पनवेल येथील कनिष्ठ न्यायालयात वरिष्ठ लिपीक पदावर काम करत होता. त्याला ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

संपादकीय भूमिका :

न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी फसवणूक करणार्‍यांना बडतर्फच करायला हवे !