इंदूर (मध्यप्रदेश) – वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी नुकतेच येथील राजवाडा चौकात आंदोलन केले. या वेळी वक्फ बोर्ड पूर्णपणे विसर्जित करण्याची मागणी करणारे एक निवेदन पंतप्रधानांच्या नावे देण्यात आले.
या आंदोलनात संत श्री कालीपुत्र कालीचरण महाराज (पुणे), हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सिंह ठाकूर, महामंडलेश्वर श्री श्री १०८ भरतदास महाराज, श्री श्री १०८ महामंडलेश्वर दिनेश दास महाराज, महामंडलेश्वर विजय रामदास बेटमा, श्री. महंत रुक्मणी देवी, महंत राजनाथ योगी, गणेशदास राजगुरु, बाल मुकुंद पराशर (मुख्य पुजारी, गोपाल मंदिर), महंत तुलसी राम (नवग्रह शनि मंदिर, कानडीया), मध्य भारतीय आर्य समाज प्रतिनिधी सभेचे प्रमुख प्रकाश आर्य, उज्ज्वल स्वामी, महंत राम गोपाल दास, महंत कृष्ण दास यांच्यासह सहस्रावधी हिंदुत्ववादी सहभागी झाले होते.
संपादकीय भूमिकाहिंदूंना जाचक ठरणार्या गोष्टी रहित करण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन होत नसल्यामुळे संतांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे जन्महिंदूंसाठी लज्जास्पद ! |