हडपसर (जिल्हा पुणे) येथे २ सहस्र किलो गोमांस जप्त !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना !

देहली येथील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि देशात ‘लव्ह जिहाद बंदी’ कायदा लागू करावा !

लव्ह जिहाद या विषयावर लवकरात लवकर आभ्यास करून लव्ह जिहाद बंदी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशा मागण्या समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तळोदा येथील तहसीलदार श्री. गिरीश वखारे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आल्या.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील ५३६ उद्योजकांना नोटीस !

राज्यातील अनेक उद्योजकांनीमधील भूखंड स्वत:च्या कह्यात ठेवले आहेत. हे भूखंड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विशेष मुदतवाढ योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

पारगाव (पुणे) येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी मुली आणि महिला यांना विनामूल्य दाखवला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे, या हेतूने हा चित्रपट विनामूल्य दाखवल्याचे धर्मप्रेमींनी सांगितले.

परदेशी नागरिकांची माहिती तात्काळ कळवा ! – समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, कराड, फलटण, शिरवळ, खंडाळा, म्हसवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशी नागरीक येत असतात. या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून परदेशी नागरिक जिल्ह्यात आल्यानंतर त्यांची माहिती तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. 

केशवनगर येथील मुळा-मुठा नदीच्या विकासन प्रकल्पाच्या नावाखाली वाळूचा अवैध उपसा चालू !

वाळूचोरीचा प्रश्न गंभीर असून शासनाने दोषींवर त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे !

१ जून ते ३१ जुलै या काळात खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी !

पावसाळ्यात मासळीच्या प्रजननाचा कालावधी असल्याने १ जून ते ३१ जुलै या २ मासांसाठी खोल समुद्रातील मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाने बंदी घातली आहे. या बंदीकाळामुळे उरणच्या करंजा आणि मोरा या बंदरावर शेकडो मासेमारी बोटी किनार्‍यावरच लावण्यात आलेल्या आहेत.

सातारा शहराचा ऐतिहासिक वारसा जपावा ! – शंभूराज देसाई

गांधी मैदान येथे श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामाने ३५० व्या श्री शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.