येरवडा (पुणे) येथे बंदीवानांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी होणार अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर !

येरवडा (पुणे) – येथे बंदीवानांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर केला जाणार आहे. ‘कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण २०२३-२४’ या योजनेच्या अंतर्गत ही प्रणाली चालू करण्यात आली आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील ‘इव्हेंडर टेक्नोलॉजीज’ आस्थापनाच्या वतीने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (कारागृह आणि सुधारसेवा) प्रशांत बुरडे, डॉ. जालिंदर सुपेकर, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात येरवडा मध्यवर्ती आणि महिला कारागृहात बायोमेट्रिक, पॅनिक अलार्म आणि सार्वजनिक संबोधन प्रणाली बसवण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ही प्रणाली राज्यातील इतर कारागृहातही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.