‘हलाल’मधून हिंदूंचा पैसा आतंकवादी कारवायांसाठी जात आहे ! – कपिल मिश्रा, संस्थापक, हिंदु ईकोसिस्टम

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पंचम दिवस – मान्यवरांचे विचार

विद्याधिराज सभागृह, २० जून (वार्ता.) – वर्ष २०२२ मध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी नवी देहलीमध्ये जहांगिरपुरी येथे हिंदूंवर मुसलमानांनी बाँब आणि गोळ्या यांनी आक्रमण करून दगडफेक केली. हे आक्रमण करणारे भंगारवाले बंगालादेशी घुसखोर होते. या प्रकरणात पोलिसांनी अन्सार नावाच्या मुसलमानाला अटक केली. अन्सार याचा खटला लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील ५ मोठे अधिवक्ता उभे राहिले. ‘जे अधिवक्ता एका खटल्याच्या सुनावणीला लाखो रुपये शुल्क घेतात, असे अधिवक्ता एका भंगारवाल्या मुसलमानाचा खटला लढण्यासाठी का सिद्ध झाले ?’, याची माहिती घेतली असता ‘जमियत उलेमा-ए-हिंद ’ या संस्थेकडून या अधिवक्त्यांना पैसे देण्यात आल्याचे समजले.

श्री. कपिल मिश्रा

प्रयागराज येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात ५६ लोक मारले गेले. या प्रकरणात ३० मुसलमानांना शिक्षा झाली. या सर्वांचा खटलाही ‘जमियत उलेमा-ए-हिंद’कडून लढवला गेला. या संस्थेकडे हा पैसा हलाल उत्पादनांच्या खरेदीतून येत आहे. ‘केस कापणे’, ‘भाजी खरेदी करणे’ यांसाठी हिंदू अन्य धर्मियांना पैसे देत आहेत, तो पैसा ‘जमियत उलेमा-ए-हिंद’पर्यंत जातो आणि हाच पैसा आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी वापरला जातो. लव्ह जिहादच्या आरोपींना सोडवण्यासाठी या पैशांतूनच अधिवक्त्यांची फौज उभी केली जाते. अशा प्रकारे हिंदूंच्या विरोधात ‘अर्थव्यवस्था’ निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्र आणि हिंदु धर्मविरोधी शक्तींचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. या संकटाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी जातींमधील भेद विसरून एकत्र यायला हवे, असे वक्तव्य हिंदु ईकोसिस्टमचे संस्थापक श्री. कपिल मिश्रा यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशीच्या सत्रात केले.