वर्ष २०१३ मध्ये गणेशोत्सव कालावधीत दाखलप्रविष्ट झालेल्या खटल्यात राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी निर्दाेष !

वर्ष २०१३ मध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत प्रविष्ट झालेल्या खटल्यातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना पदाधिकारी आणि खंडोबा तालीमेचे कार्यकर्ते यांची जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता केली.

रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे विहिरीमध्ये आढळले मृत मासे !

अशी मागणी जनतेला पुन:पुन्हा का करावी लागते ? खरेतर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या समस्येवर ठोस उपाययोजना काढायला हवी !

देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा !

अनेक हिंदु मुलींची हत्या करणार्‍या धर्मांध लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर लटकवा आणि देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान !

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटीवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चौपाटीवरील वाळू रस्त्यावर !

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम गिरगाव चौपाटी भागात दिसू लागला. तेथे सोसाट्याचा वारा वहात असल्याने चौपाटीवरील वाळू रस्त्यावर येत होती. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते.

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान !

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने १० जून या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी ९ जूनपासून शहरात येत होते.

राज्यात १ सहस्र ४ अपघातप्रवण क्षेत्रे आढळली !

राज्यातील विविध रस्त्यांवर १ सहस्र ४ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट) आढळून आली आहेत. यासंदर्भातील सूची नुकतीच परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली

गोव्यात होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त उत्तरप्रदेश आणि बिहार येथील ११० प्रतिनिधी सहभागी होणार !

भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याला पर्याय नाही, असे मत हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.

यंदा जगात सर्वाधिक सकल देशांतर्गत उत्पादन भारताचे असणार !

भारताची अर्थव्यवस्था ५.९ टक्क्यांनी वधारेल. दुसर्‍या क्रमांकावर चीन असून त्याचा जीडीपी हा ५.२ टक्के असेल. त्यानंतर इंडोनेशिया (५ टक्के), नायजेरिया (३.२ टक्के) आणि सौदी अरेबिया (३.१ टक्के) या देशांचा क्रमांक लागतो.

हिंदूंच्या धर्मांतराला ‘बॉलीवूड’ उत्तरदायी ! – मध्यप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान

हे संपूर्ण पाप बॉलीवूडमुळेच पसरले आहे. गेल्या ७० वर्षांत मोठमोठ्या अभिनेत्यांनी विवाह केला आणि त्यानंतर त्यांच्या पत्नींना इस्लाम स्वीकारायला लावला. त्यामुळे नवी पिढीही बॉलीवूडचेच अनुकरण करत आहे.