सोलापूर येथे ‘आय लव्‍ह पाकिस्‍तान’ लिहिलेल्‍या फुग्‍यांची विक्री करणारे कह्यात !

इदगाह मैदान येथे नमाजपठणासाठी आलेल्‍या एका व्‍यक्‍तीचे फुगेवाल्‍याकडे लक्ष गेले. त्‍या वेळी त्‍याला फुग्‍यांवर आक्षेपार्ह लिखाण असलेले फुगे आढळून आले. त्‍यानंतर त्‍याने त्‍वरित पोलिसांना त्‍याविषयी माहिती दिली.

अंतिम निर्णय होईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्‍हे, तर औरंगाबाद हे नाव वापरणार !

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्‍यात आले आहे. या नामांतराला मुंबई उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान देण्‍यात आले आहे. या प्रकरणी झालेल्‍या सुनावणीत न्‍यायालयाने ‘अंतिम न्‍यायनिवाडा होईपर्यंत राज्‍य सरकार बदललेली नावे वापरणार नाही’, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

छत्रपती संभाजीनगर येथे आषाढी एकादशीच्‍या दिवशी रस्‍त्‍यावर मांसाचे तुकडे टाकले !

शहरातील मध्‍यवर्ती भाग असलेल्‍या गारखेडा परिसरात हेडगेवार रुग्‍णालयाच्‍या मागील बाजूस असलेल्‍या रस्‍त्‍यावर २९ जून या दिवशी सकाळी मांसाचे तुकडे पडलेले आढळून आले.

गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्‍लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्‍याचप्रमाणे संतांच्‍या ठिकाणी भेदभाव नाही. त्‍यांची दयादृष्‍टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्‍यांच्‍या ठिकाणी लीन असतो, त्‍याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्‍ती होते.

हिंदु विद्यार्थिनी कुंकू तरी लावतात का ?

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एम्.बी.बी.एस्.च्‍या ७ मुसलमान विद्यार्थिनींनी शस्‍त्रक्रिया विभागात (‘ऑपरेशन थिएटर’मध्‍ये) हिजाब घालून जाण्‍याची मागितलेली अनुमती नाकारण्‍यात आली.

पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांचा डाव होता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र

सरकार स्‍थापन करण्‍याचा प्रयत्न आम्‍ही शरद पवार यांच्‍याशी चर्चा करूनच केला होता. शरद पवार यांनी आमचा उपयोग करून घेतला. रणनीती आखली आणि एकप्रकारे आमची दिशाभूल करून निघून गेले.

दुधात भेसळ करणार्‍यावर गुन्‍हा नोंद होणार, तर स्‍वीकारणारा सहआरोपी होणार !

दुधातील भेसळ रोखण्‍यासाठी अपर जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यांत समितीची स्‍थापना करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांच्‍या स्‍वेच्‍छानिवृत्तीचा अर्ज संमत !

विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांची मे २०२५ मध्‍ये निवृत्त व्‍हायचे असतांना त्‍यांनी २३ मास आधीच स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतली. २४ आणि २६ मे २०२३ या दिवशी त्‍यांनी अर्ज केला होता.

नागपूर येथील व्‍यापार्‍यांनी सडकी सुपारी आयात करून म्‍यानमारसह ईशान्‍य आशियातील सीमाशुल्‍क चुकवला !

सडकी सुपारी आयात केल्‍याप्रकरणी आरोपी वसीम बावला याला न्‍यायालयाने ३० जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे.