कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी असल्याचा आदेश काढला आहे. याचसमवेत अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार !

६ जून या दिवशी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.

मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मंत्रीमंडळाविषयी अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहा सकारात्मक आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.

मंचरच्या घटनेमुळे ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद होत नाही’ हा अपसमज दूर झाला असेल ! – नितेश राणे, आमदार, भाजप

हिंदु समाज आता जागृत होत चालला आहे. जो कुणी धर्म पालटण्याची बळजोरी करणार असेल, तर तो २ पायांवर जाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या अधिकोषातील खात्यांचे अन्वेषण चालूच !

धनगर यांच्या पहिल्याच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या खात्यातून १२ लाख ७१ सहस्र रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या घरातून ८५ लाख रुपयांसह ३२ तोळे सोने हस्तगत करण्यात आले होते. अद्यापही २ अधिकोषातील खात्यांसह लॉकरचे अन्वेषण चालू आहे.

कोल्हापूर येथे हिंदु युवतीस पळवणार्‍या धर्मांधास अटक

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदाच आवश्यक !

विशाळगड येथील छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रशासनाने हटवली !

‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने विशाळगड येथे पंत प्रतिनिधीच्या वाड्याच्या परिसरात ३ जूनच्या रात्री ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची ५ फूट उंचीची फायबरची मूर्ती बसवण्यात आली होती.

‘ऑनलाईन’ खेळाच्या माध्यमातून हिंदु मुलांचे धर्मांतर करण्यासाठी धर्मांधांची टोळी सक्रीय !

हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास त्यांना स्वधर्माचे महत्त्व कळून त्यांच्यात स्वधर्माविषयी अभिमान वाढेल आणि मग ते अशा धर्मांतराच्या षड्यंत्राला कदापि बळी पडणार नाहीत !

अहिल्यानगर (नगर) येथे मिरवणुकीत धर्मांधांनी मिरवले क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र !

क्रूरकर्मा टिपू सुलतान, अझफलखान आणि औरंगजेब या हिंदुद्वेष्ट्या आक्रमकांचे उदात्तीकरण करणारे उद्या त्यांच्याप्रमाणे वागू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! त्यामुळे अशांना सरकारने वेळीच कारागृहात डांबणे आवश्यक आहे !

ओडिशा अपघातस्थळावरील रेल्वे वाहतूक ५१ घंट्यांनी पूर्ववत् !

अपघातानंतर ५१ घंट्यांनी जेव्हा पहिली रेल्वे रुळावरून मार्गस्थ झाली, तेव्हा रेल्वेमंत्री हात जोडून उभे होते. ते म्हणाले की, आमचे दायित्व अजून संपलेले नाही. ‘हरवलेल्या लोकांना शोधणे, हे आमचे ध्येय आहे’, असे म्हणत ते भावूक झाले.