आषाढी वारी मार्गावरील खासगी रुग्‍णालये चालू ठेवण्‍याच्‍या आरोग्‍यमंत्र्यांच्‍या सूचना !

वारकर्‍यांना तात्‍काळ आरोग्‍यविषयक सुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागाने ‘आरोग्‍याची वारी, पंढरीच्‍या दारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पालखी मार्गावर आवश्‍यक त्‍या आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.

वारकर्‍यांनी पाणी वापरासाठी कालव्‍याच्‍या घाटांचा उपयोग करावा ! – जलसंपदा विभागाचे आवाहन

जलसंपदा विभागाने आवश्‍यक ती काळजी घेतली आहे; पण वारकर्‍यांनी आंघोळ किंवा कपडे धुण्‍यासाठी कालव्‍यात न उतरता आवश्‍यकता वाटल्‍यास घाटांचा उपयोग करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

राष्ट्राच्या उत्थानासाठी योग आणि अध्यात्म यांची आवश्यकता ! – डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल, अध्यक्ष, सत्यमेव जयते

भारत स्वतंत्र झाल्यानंतर शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार थांबलेला नाही. शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये योग आणि अध्यात्म यांचे शिक्षण दिल्यास भ्रष्टाचार रोखता येईल. अध्यात्म ही भारताची शक्ती आहे. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी !

‘आदिपुरुष’ चित्रपटातील वादग्रस्‍त संवादांमुळे देशभरात विरोध होत आहे. हे संवाद लिहिणारे प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर यांनी स्‍वतःच्‍या जीविताला धोका असल्‍याने मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी आणा !

भगवान श्रीरामावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्‍या विरोधात नाशिकमधील संत आणि महंत यांनी एकत्रित येऊन आंदोलन केले.

कुरिअरद्वारे तलवार मागवणार्‍या मुसलमान वडील आणि मुलगा यांना अटक !

कुरिअरद्वारे तलवार मागवणारे मुसलमान वडील आणि मुलगा यांना पोलिसांनी अटक केली. अदनान सादिक खाटीक (वय १९ वर्षे) हा पांढर्‍या गोणीतून झाकून तलवार आणत होता.

छत्तीसगडमध्‍ये गेल्‍या ४ वर्षांत हिंदूंच्‍या धर्मांतरामध्‍ये वाढ ! – सौ. ज्‍योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड

कोणत्‍याही राज्‍यात होत नसेल, एवढे हिंदूंचे धर्मांतर छत्तीसगड राज्‍यात चालू आहे. यात मागील ४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. ख्रिस्‍ती धर्मप्रचारक पैसे आणि रेशन यांचे प्रलोभन देऊन महिलांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत.

पबजीतून मैत्री झालेल्‍या तरुणीचा संगमनेरमधून (अहिल्यानगर) अपहरणाचा प्रयत्न !

अक्रमने तिला ‘ माझ्यासोबत बिहारला चल, आपण लग्न करू’  असा आग्रह धरला., मुलीने त्यास नकार दिला; मात्र अक्रम आणि नेमतुल्ला यांनी ‘तुला यावेच लागेल, नाही तर तुझ्‍या घरी येऊन तुझी अपकीर्ती करू’, अशी धमकी दिली.

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी आणा ! – नाशिक येथील साधू-महंत

‘आमच्या देवतांचा अवमान करणार्‍या अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ प्रमाणपत्रच कसे देते ? या चित्रपटावर बंदी आणा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. संत आणि महंत यांनी चित्रपटाच्या विरोधात घोषणाही दिल्या.

भारताला गुलाम करण्‍यासाठी इंग्रजांनी ‘गुरुकुल परंपरा’ मोडीत काढली ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

वर्ष १८०० पूर्वी आपली शिक्षणपद्धती अत्‍यंत समृद्ध होती. त्‍या काळी ७० टक्‍के लोक सुशिक्षित म्‍हणजे नीतीवान आणि संस्‍कारित होते. देशातील प्रत्‍येक गावामध्‍ये १ गुरुकुल होते, अशी नोंद ब्रिटिशांनीच करून ठेवली आहे.