गोमांसाची अवैध विक्री करणार्यांवर गुन्हा नोंद !
कोंढवा (जिल्हा हडपसर) – येथील कसायी गल्लीतून १४ जून या दिवशी गोमांसाची वाहतूक होणार आहे, याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षक आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी पोचले अन् पोलिसांच्या साहाय्याने गोमांस असलेली गाडी पकडली. पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
दुसर्या एका प्रकरणात १७ जून या दिवशी जनवाडी गोखलेनगरमध्ये गोमांस विक्री चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी कसायाला पकडले. त्या वेळी त्याने मुसलमानांचा जमाव एकत्रित करण्यास चालू केले. तेव्हा गोरक्षकांनी जनवाडी पोलिसांचे साहाय्य घेऊन गोमांसाने भरलेली गोणी उघडली. त्यामध्ये गायीचे तोंड, धड, पाय आढळून आले. या कारवाईसाठी मानद पशूकल्याण अधिकारी बजरंग दल गोरक्षा विभागाचे ऋषि भागवत, करण वाकोडे, सोमेश गायकवाड, निकुंज बत्रा, ऋषि चावरे, शशिकांत नाईक, चैतन्य सुडे, आकाश पारडे आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले.
संपादकीय भूमिकाप्रत्येकवेळी गोमांसाची वाहतूक होणार हे गोरक्षकांनाच कसे कळते ? याचा पोलीस विचार करतील का ? |