
रामनाथ देवस्थान – ज्या देशात ८० टक्के जनता सनातन धर्मीय आहे, त्याच देशात सनातन धर्माच्या श्रद्धेशी संबंधित गोमातांची हत्या होत आहे. जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही भूमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील. त्यामुळे अखंड भारत हवा असेल आणि त्याचे विभाजन थांबवायचे असेल, तर गोहत्या थांबवणे आवश्यक आहे, असे मत गोरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सतीश कुमार यांनी ‘ वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ५ व्या दिवसी व्यक्त केले.
भारतातील गायी बांगलादेशात पाठवल्या जातात. त्या बदल्यात बनावट नोटा आणि अमली पदार्थ भारतात पाठवले जातात. त्याच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशाने देशात आतंकवाद पसरवरा जात आहे. त्यामुळे ही गोतस्करी थांबवणे एक धर्मकार्य आहे. पांडवांना केवळ ५ गावांसाठी युद्ध करावे लागले. आपल्याला तर हिंदु राष्ट्र हवे आहे. त्यामुळे तेही संघर्ष केल्याविना मिळणार नाही. हा संघर्ष करतांना मृत्यू आला, तरी मोक्ष मिळेल आणि जिवंत राहिल्यास हिंदु राष्ट्र मिळेल. हिंदु राष्ट्राच्या आवाजाने प्रचंड रूप धारण केले आहे.
खलिस्तानी आतंकवाद हा हिंदु आणि शीख यांना तोडण्याचा प्रयत्न आहे. कुणालाही स्वतंत्र खलिस्तान नको आहे. विदेशी शक्ती धनाच्या बळावर भारतात निरपराध लोकांची हत्या करत आहे.
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार