२५० किलो गोमांसाची अवैध वाहतूक केल्‍याच्‍या प्रकरणी यवत (जिल्‍हा पुणे) येथे ६ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

दौंड येथील पशूवधगृहातून पुणे येथे ४ जून या दिवशी गोमांसाची अवैध वाहतूक होणार असल्‍याची बातमी गोरक्षा दल महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या गोरक्षकांना मिळाली होती. त्‍यानुसार ही गाडी पकडण्‍यासाठी मानद पशूकल्‍याण अधिकारी ऋषिकेश कामथे, गोरक्षक अक्षय कांचन, राहुल कदम, प्रतीक कांचन, विशाल राऊत हे उरळी कांचन येथील मुख्‍य चौकात पहार्‍यासाठी थांबले होते.

मुकादम आणि वाहतूकदार यांच्‍याकडून राज्‍यातील साखर कारखान्‍यांची २०० कोटी रुपयांची फसवणूक !

ऊस तोडणी मुकादम आणि वाहतूकदार यांच्‍याकडून साखर कारखानदारांची २०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक ऊसतोडणीसाठी कारखान्‍यांकडून वाहतूकदार आणि मुकादम यांच्‍याशी केलेल्‍या कराराच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आली असल्‍याची माहिती, राष्‍ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्‍यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.

संगमनेर (जिल्हा नगर) येथे हिंदु आक्रोश मोर्च्यानंतर धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक : २ जण घायाळ !

संगमनेर (जिल्हा नगर) येथे ‘भगवा मोर्चा’ पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवर असतांना संगमनेरजवळील समनापूर गावात धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक केली.

नवी मुंबईमध्‍ये पर्यावरणदिनी वृक्षारोपण मोहीम; एक लाख वृक्षारोपणाचा संकल्‍प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून या दिवशी वाशी सेक्‍टर १४ येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्‍ये भाजप, ग्रीन होप संस्‍था आणि श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्‍ट यांच्‍या माध्‍यमातून भव्‍य वृक्षारोपण मोहीम राबवण्‍यात आली.

जर्मनीतील प्रशिक्षक राज्यातील क्रीडा शिक्षकांना फूटबॉलचे प्रशिक्षण देणार ! – रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्ट्र

महाराष्ट्रात फूटबॉल या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनीमधील ‘फूटबॉल क्लब बायर्न’ या जगप्रसिद्ध संस्थेशी ‘सहकार्य करार’ केला आहे.

हिंदु मुलींची हत्‍या करणार्‍या लव्‍ह-जिहाद्यांना तात्‍काळ फासावर चढवा ! – कु. वर्षा जेवळे, हिंदु जनजागृती समिती

देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ यांच्‍या हत्‍यांनंतर देशभरात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा होणे आवश्‍यक बनले आहे. यासमवेतच ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना केवळ फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या कु. वर्षा जेवळे यांनी केली.

‘लव्‍ह जिहाद’ला तोंड देण्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्‍वरक्षण शिकणेही आवश्‍यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

‘लव्‍ह जिहाद’ आपल्‍या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे. ‘लव्‍ह जिहाद’ला तोंड देण्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्‍वरक्षण शिकणेही आवश्‍यक आहे. हिंदु युवती आणि महिला यांनी कोणत्‍याही आमिषाला बळी न पडता हिंदु संस्‍कृतीप्रमाणे आचरण करणे आवश्‍यक आहे.

कास धरणातील बाधित रस्‍त्‍यांची निर्मिती अजूनही प्रतीक्षेत ?

सातारा शहराला भरपूर प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी कास तलावाची उंची वाढवण्‍याचे काम गत ४-५ वर्षांपासून चालू होते. ते आता पूर्ण झाले असून तलावाजवळील वाहतुकीसाठीच्‍या नवीन पुलाचे कामही पूर्णत्‍वास आले आहे; मात्र धरणातील इतर बाधित झालेल्‍या रस्‍त्‍यांची निर्मिती अद्याप झालेली नाही.

नीरा नदी दूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – प्रल्‍हाद सिंह पटेल

पटेल यांनी सोनगाव येथील सोनेश्‍वराचे दर्शन घेतले, तसेच नीरा नदीची पहाणी केली. या वेळी नदीची सगळ्‍यात अधिक हानी पशूवधगृहामुळे झाली आहे. नीरा नदी दूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी त्‍यांनी प्रदूषण करणार्‍यांना दिली आहे.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाणार्‍या महिला हवालदाराची धर्मांधाकडून छेडछाड आणि अरेरावी !

पोलिसांकडून महिला हवालदाराचीच तक्रार घेण्यास टाळाटाळ ! महिला पोलिसांचीही तक्रार न घेणारे पोलीस सर्वसामान्य हिंदु महिलांची तक्रार कधी घेतील का ? अशांना तात्काळ बडतर्फ करा !