कन्‍नड सक्‍तीच्‍या विरोधात आंदोलन करणार्‍या हुतात्‍म्‍यांना बेळगाव येथे अभिवादन !

वर्ष १९८६ मध्‍ये कन्‍नड सक्‍तीच्‍या विरोधात आंदोलन करण्‍यात आले होते. त्‍या आंदोलनात ९ जणांना बलीदान द्यावे लागले होते. या हुतात्‍म्‍यांना १ जून या दिवशी महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्‍या वतीने हिंडलगा येथील हुतात्‍मा स्‍मारक येथे अभिवादन करण्‍यात आले.

पुणे शहरातून एका सप्‍ताहामध्‍ये १० अल्‍पवयीन मुलींसह ३ मुले बेपत्ता !

शहरातून २४ मे या एकाच दिवशी वेगवेगळ्‍या घटनांमध्‍ये ४ मुली आणि १ मुलगा असे ५ जण घरातून निघून गेल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. या ५ जणांसह मागील सप्‍ताहामध्‍ये १० अल्‍पवयीन मुलींसह ३ मुले बेपत्ता झाल्‍याची पोलिसांमध्‍ये नोंद झाली आहे.

रायगडावरील ‘गाईड्‌स’ना शिवसेनेकडून दिले जाणार आरोग्‍य विम्‍याचे संरक्षण !

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वर्षानुवर्षे सांगणार्‍या २२ गाईड्‍सना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्‍या वतीने वार्षिक ५ लाख रुपयांचे आरोग्‍य विम्‍याचे संरक्षण दिले जाणार आहे.

ठाणे जिल्‍ह्यात ४७ शाळा अनधिकृत !

अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्‍यांच्‍या पाल्‍यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने केले आहे.

पुणे येथील सीमा शुल्‍क विभागाने अमली पदार्थांची तस्‍करी करणारी टोळी पकडली !

सीमा शुल्‍क विभागाच्‍या नार्कोटिक्‍स विभागाच्‍या पथकाला मिळालेल्‍या माहितीअन्‍वये अमली पदार्थ तस्‍करी करणार्‍या टोळीला पकडण्‍यात यश आले आहे.

मान्‍सूनपूर्व कामांत हलगर्जीपणा झाल्‍यास आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी

मान्‍सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्‍यात आली, त्‍या वेळी ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर येथील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्‍याप्रकरणी कृषी आयुक्‍तांना ‘ईडी’ची नोटीस !

पंतप्रधान आवास योजना घोटाळ्‍यात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी तथा कृषी आयुक्‍त सुनील चव्‍हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या घरकुल योजनेत १ सहस्र कोटींचा भ्रष्‍टाचार झाल्‍याचा आरोप झाला होता.

नवी मुंबईत सांडपाण्‍यावर घेतले जाते भाज्‍यांचे पीक !

नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्‍वेच्‍या स्‍थानकांलगत पिकणार्‍या पालेभाज्‍या या गटाराच्‍या पाण्‍यावर पिकवण्‍यात येत आहेत आणि किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालक यांना त्‍या विकल्‍या जात आहेत.

देवस्‍थानच्‍या विश्‍वस्‍त निवडीविषयी राजकीय पक्षाने हस्‍तक्षेप करू नये !

मंदिर समितीवर स्‍थानिक लोकांची नेमणूक नक्‍कीच व्‍हावी; पण ती गुरव समाजातूनच व्‍हावी आणि किमान ५० टक्‍के विश्‍वस्‍त हे सनदधारी गुरव समाजातून निवडले जावेत. त्‍यामुळे या निवडीविषयी आक्षेप असल्‍याचे महासंघाकडून सांगण्‍यात आले.

मंचर (पुणे) येथील लव्ह जिहाद प्रकरणी हिंदु मुलीचा भयंकर छळ झाल्याचे उघड !

पीडित हिंदु मुलगी या लव्ह जिहाद्यांच्या कह्यात होती. या कालावधीत या धर्मांध मुलाच्या कुटुंबियांनी तिला बुरखा घालण्यास भाग पाडले, गोमांस खाऊ घातले, नमाज पडण्याची सक्ती केली, सिगारेटचे चटके दिले.