बकरी ईदच्‍या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्‍या वाहतुकीच्‍या संदर्भातील नियमांचे पालन करावे ! – पुण्‍याचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी

जनावरांची वाहतूक करण्‍यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्‍या बांधणीमध्‍ये सुयोग्‍य पालट करून नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्‍त करून घेणे बंधनकारक आहे

हडपसर (पुणे) परिसरात पालखीच्‍या मार्गावर गोळा झालेला कचरा त्‍वरित हटवला !

मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाच्‍या घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाने पालखी प्रस्‍थानानंतर त्‍वरितच कचरा गोळा केला. क्षेत्रीय कार्यालयाच्‍या परिसरातील सोलापूर आणि सासवड महामार्गावर हा कचरा गोळा करण्‍यात आला.

पाण्‍याच्‍या पुनर्प्रक्रियेतून नवी मुंबई महापालिकेला ५०० कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न मिळणार ! – गणेश नाईक, आमदार

पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी प्रकल्‍पातील पाण्‍याच्‍या विक्रीतून महापालिकेला ५०० कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न मिळणार आहे. केंद्र सरकारच्‍या अमृत योजनेतून हा प्रकल्‍प उभारण्‍यात आला आहे, अशी माहिती भाजपचे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली येथे दिली.

पुणे येथे सव्‍वासहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्‍ट !

४७ गुन्‍ह्यांमध्‍ये दीड सहस्र किलो गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आले होते. न्‍यायालयीन प्रक्रियेनंतर २९ गुन्‍ह्यांतील गांजा आणि चरस नष्‍ट करण्‍याची अनुमती मिळाली.

डॉ. रामोड यांच्‍या कुटुंबियांच्‍या खात्‍यात मिळाले ४७ लाख रुपये !

महामार्ग लगतच्‍या भूमी प्रकरणात सकारात्‍मक निकाल देण्‍यासाठी शेतकर्‍याकडून ८ लाख रुपयांची लाच स्‍वीकारणारे अप्‍पर विभागीय आयुक्‍त डॉ. अनिल रामोड आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍य यांच्‍या अधिकोशातील १७ खाती केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने पडताळली असून या खात्‍यांमध्‍ये सीबीआयला ४७ लाख रुपये मिळाले आहेत.

पुणे येथे तिकीट तपासनीसाच्‍या सतर्कतेमुळे गाडीत राहिलेला मुलगा आई-वडिलांना सापडला !

सोन्‍ना हे तिकीट तपासनीस असून ते नियमित रात्रीच्‍या ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गाला उपस्‍थित असतात. त्‍यांच्‍या साहाय्‍याने गाडीत राहिलेल्‍या मुलाला आई-वडिलांच्‍या स्‍वाधीन केले. तिवारी आणि सोन्‍ना यांच्‍या प्रसंगावधानतेमुळे गाडीत राहिलेला मुलगा आई-वडिलांना सापडला आहे. त्‍यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.

पैठण येथील संतपिठात १५० विद्यार्थी, १० प्राध्‍यापक; मात्र उपस्‍थित कुणीही नाही !

एका पहाणीत संतपिठाच्‍या वर्गात एकही विद्यार्थी दिसला ना प्राध्‍यापक ! संतपीठाचे समन्‍वयक डॉ. प्रवीण वक्‍ते यांनी प्राध्‍यापक प्रतिदिन येत असल्‍याचा दावा केला

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्‍लक

गुरुप्राप्‍ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्‍यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्‍यभर सातत्‍याने करीत रहाणे आवश्‍यक असते. 

ज्‍येष्‍ठ शिवसैनिक विजय गावकर यांचे निधन

शिवसेनेचे परळचे पहिले शाखाप्रमुख आणि माजी नगरसेवक विजय गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्‍यांच्‍या पार्थिवावर भोईवाडा स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. या वेळी परळ, शिवडी, लालबाग भागातील अनेक ज्‍येष्‍ठ शिवसैनिक उपस्‍थित होते.

सामाजिक माध्‍यमांवरील ‘वर्क फ्रॉम होम’च्‍या विज्ञापनाद्वारे महिलेची १८ लाखांची फसवणूक !

सध्‍या सामाजिक माध्‍यमांवरील फेसबूक, इन्‍स्‍टाग्राम, व्‍हॉट्‍सअ‍ॅप, टेलिग्राम यांतून रोजगारांची अनेक विज्ञापने दिसून येतात. अनेक तरुण-तरुणी रोजगार मिळेल, या आशेने तिथे संपर्क साधतात; मात्र काही वेळा त्‍यांची फसवणूक होत असल्‍याचे प्रकार समोर आले आहेत.